बुधवार, ५ मे, २०१०

एखाद्या फोल्डरला पासवर्डशिवाय कसे लॉक कराल ???




एखाद्या फोल्डरला पासवर्डशिवाय कसे लॉक कराल ???
माझ्या How to protect MS-Office documents by giving password आणि How to make folder password protected without any software या दोन्ही लेखांना दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!!

परंतु या दोन्ही लेखांपेक्षाही भन्नाट युक्ती मला सापडली आहे की ज्याद्वारे तुम्ही एखादे भले मोठे किंवा छोटे फोल्डर सुद्धा लॉक करू शकता आणि तेही कोणतेही सोफ्टवेअर न वापरता. म्हणजे आता तुमचे फोल्डर अगदी GB मध्ये का असेना !!! त्याला देखील तुम्ही लोक करू शकता. आहे फक्त एवढेच की आतापर्यंत मी ज्या काही फाईल्स किंवा फोल्डर लॉक करण्याच्या युक्त्या सांगितल्या त्या मध्ये पासवर्ड चा वापर केला गेला. आता तुम्ही फोल्डर लॉक कराल पण पासवर्डशिवाय !!!ऐकून जरा विचित्र वाटेल पण हे खरं आहे. ही युक्तीच तशी आहे. चला तर मग शिकूया काय आहे ही युक्ती...
जे फोल्डर तुम्हाला लॉक करायचे आहे ते आधी निवडा. समजा तुम्हाला D Drive वरील mydata नावचे फोल्डर लॉक करायचे आहे (mydata या नावाच्या ऐवजी तुम्हाला जे फोल्डर लॉक करायचे आहे त्याचे नाव लिहावे लागेल कृपया याची नोंद घ्या).

तुम्ही Notepad ओपन करा. त्यामधे खाली जी Command दिली आहे ती जशीच्या तशी कॉपी करा आणि ती फाईल Lock.bat या नावाने D drive वरंच सेव्ह करा म्हणजेच तुम्हाला जे फोल्डर लॉक करायचे त्याच ठिकाणी Lock.bat ही फाईल निर्माण होणे आवश्यक आहे.
ren mydata mydata.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}





















तुम्हाला पुन्हा नविन Notepad उघडून खालील Command जशीच्या तशी कॉपी करा आणि ती फाईल Key.bat या नावाने D drive वरंच सेव्ह करा.
ren mydata.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D} mydata


















आता तुम्ही D drive ओपन करा. आणि Lock या फाईलवर डबल क्लिक करा, काय चम्त्कार होईल माहीत आहे तुमचे mydata हे फोल्डर Control Panel च्या icon मध्ये बदललेले दिसेल.











खरी गम्मत तर पुढे आहे, तुम्ही त्या mydata आयकॉनवर (म्हणजेच मुळचे myd
ata हे फोल्डर) क्लिक केलेत तर तुम्ही थेट Control Panel मध्ये जाऊन पोहोचाल.
तुम्हाला तुमच्या मुळ फोल्डर मध्ये काही बदल करायचे झाल्यास तुम्हाला Key.bat या फाईलवर डबल क्लिक करावे लागेल म्हणजे तुमचे आधीचे फोल्डर मिळेल.






अधिक गौप्यता राखावी यासाठी तुम्ही Lock.bat या फाईल वर डबल क्लिक करा. एकदा का तुमचे फोल्डर Control panel च्या icon मध्ये बदलले की Key.bat ही फाईल हव्या त्या स्थलांतरित करुन ठेवा. उदा. पेन ड्राईव्ह किंवा दुसर्‍या एखाद्या फोल्डरमध्ये, वगैरे
आणि जेव्हा तुम्हाल मुळ फोल्डर्मध्ये काही बदल करायचे झाल्यास पुन्हा ती Key.bat फाईल मुळ ठिकाणि (म्हणजेच या प्रात्य्क्षिकात D drive वर) स्थलांतरित करा .
पासवर्डशिवाय एखादे फोल्डर लॉक करण्याची ही अनोखी युक्ती तुम्हाला कशी वाटली हे मला जरुर कळवा. तसेच तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सुचना असल्यास त्या सुद्धा मला नक्की कळवा

* Ms- Office मधील Document ना पासवर्ड देऊन कसे सुरक्षित करता येते या विषयीची माहिती मिळवण्याकरिता येथे क्लिक करा.

* एखाद्या फोल्डरला कोणतेही सोफ्टवेअर न वापरता पासवर्ड देऊन कसे सुरक्षित करता येते या विषयीची माहिती मिळवण्याकरिता येथे क्लिक करा