सोमवार, २१ डिसेंबर, २००९

एका क्लिक मधे कंप्यूटरची हिस्टरी clear करा

कंप्यूटर मधील सर्व History,Cache,Cookes,Temporary Files,तसेच नुकत्याच ओपन केलेल्या फाइल्स तुम्हाला जर एकाच क्लिक मधे क्लेअर करायच्या असतील तर आपण हे सॉफ्टवेर जरुर वापरा. या सॉफ्टवेरच्या सहाय्याने तुम्ही खालील प्रकारची हिस्टरी क्लेअर करू शकाल --
१.Recycle बिन
२.वर्ड हिस्टरी
३.टेम्पोररी इन्टरनेट फाइल्स



४.pdf हिस्टरी
आणखी :
येथे हे softwar मिळेल


  • Clear search history (browser history)
  • Clear typed URL-s (website address)
  • Clear location bar history ( option to exclude URL-s from clearing)
  • Clear cache (temporary internet files)
  • Clear cookies (with option to exclude some cookies from deleting)
  • Clear autocomplete forms and passwords
  • Clear index.dat files
  • Delete recent documents (in Windows)
  • Delete run history
  • Delete find computers history
  • Delete Windows temporary files
  • Delete Recycle Bin without recovery (shred it after deleting)
  • Clear clipboard (memory space reserved for copy/paste operations)
  • Clear Windows Open/Save dialog history
  • Clear tracks from Ms Office, Word, Excel, Access, Power Point and Front Page
  • Clear tracks from WinZip, WinRar, undefined, Wordpad, Media Player Classic

येथे हे softwar मिळेल





- http://gavachakatta.blogspot.com/

मंगळवार, १५ डिसेंबर, २००९

डीलिट केलेली फाइल परत मिलवा ...

आपण नेहमी काँम्प्युटर स्लो चालायला लागला किंवा रिकामा वेळ भेटला म्हणजे काँम्प्युटर मधील आपल्याला नको असलेल्या फाईल डिलीट करतो. जरी त्यावेळेला आपल्याला एखादी फाईल नको आहे असे वाटत असले तरी नंतर फाईल डिलीट केल्यावर पसतावा होतो. कारण फाईल Recycle Bin मधून पण आपण Delete केली असते. अश्या वेळीस होणार्‍या असुविधेला आणि त्रासा पासून वाचण्यासाठी व Delete केलेली फाईल परत मिळवण्यासाठी एक Free Software आहे त्याचे नाव FreeUndelete 2.0.3 असेच आहे.



FreeUndelete 2.0.3 विंडोज vista, xp, 2000 आणि NT वर Software चालतो.
या software च्या सहाय्याने रिकव्हर केलेली फाइल आपण निवडलेल्या नवीन फोल्डर मध्ये किंवा निवडलेल्या जागी save होते. त्यामुळे एखाद्या फाईलच्या नावात साम्य असले तरी रिकव्हर केलेली फाईल overwrite होत नाही.
मग आता निश्‍चित रहा फाईल डिलिट करताना.
Software Size = 479 KB एवढी आहे.
FreeUndelete 2.0.3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

सोमवार, ५ ऑक्टोबर, २००९

How to Get Free Electricity

खालील लिंक ओपन करा ....
http://www.wonderhowto.com/how-to/video/how-to-get-free-electricity-from-a-phone-jack-127041/view/

Freeze a beer in two seconds - Magic Trick

How To Connect Your Laptop To Your Television


Home Entertainment:
How To Connect Your Laptop To Your Television

Power your TV using a AAA battery


More DIY videos at 5min.com

How To Make A USB Mini Fridge


Gadgets:
How To Make A USB Mini Fridge

Remotely shut down a Windows PC with a cell phone

Want to have the power to shut down your Windows PC from most anywhere on the planet? With the hack outlined in this video tutorial, you can। In order to perform this trick, you'll need the following: (1) Microsoft Windows (e.g., XP or Vista), (2) Microsoft Outlook, (3) a POP-3 e-mail account, (4) a kwiry account, and (5) a cell phone that can send text messages. For easy-to-follow, step-by-step instructions in this how-to video on getting this simple, but impressive, hack to work on your own Windows computer, take a look!

Make your own air conditioner


Make Your Own Air Conditioner - The most amazing bloopers are here

बुधवार, २३ सप्टेंबर, २००९

ओळख काही संकेतस्थळांची व सुविधांची


१. http://www.jacksonpollock.org/
रंगाशी खेळणे आवडते तुम्हाला ? तर वरील संकेतस्थळावर जा... माऊस फिरवा... बघा काय होतं ते ... थोड्या वेळाने तुम्ही स्वतःला नक्कीच एक उच्च कोटीचा मॉडर्न आर्टवाला पेंटर समजु लागला.... हा हा हा :)

२. http://www.greeniq.com/
आपली धरती / पृथ्वी हिरवीगार असावी असे वाटतं तुम्हाला... तर हे योग्य संकेतस्थळ आहे तुमच्यासाठी... ग्लोबल वॉर्मिंग पासून धरतीचे कसे रक्षण करावे ह्याची संपुर्ण माहीती व संबधीत बातम्या.. संघटना ह्यांचे दुवे !

३. http://www.5min.com/
ट्रीक्स !!! एकापेक्षा एक जबरदस्त ट्रीक्स आहेत ह्या संकेतस्थळावर.. बुध्दीबळ, सुन्न्कर, बिल्यर्ड... पियानो, गिटार.. ड्रमसेट... कसे वाजवावे कसे हताळावे ह्यांची दृष्य माहीती येथे उपलब्घ आहे.. तसेच शेयर मार्केट... कोचींग... सेल्समॅन कसे बनावे ह्याची प्रचंड माहीती ह्या संकेतस्थळावर व्हीडीओ माध्यमातून आहे... बेस्ट वेबसाईट !

४. http://www.slacker.com/
इंन्टर्नॅशनल गाण्यांसाठी एक जबरदस्त / कमी महाजाल वेगामध्ये देखील व्यव्स्थीत काम करणारे रेडिओ स्टेशन !

५. http://onelook.com/

शब्द संग्रह !!! पण असा तसा नाही... एक शब्दाच्या अर्थाबरोबर.. त्याची पुर्ण माहीती देखील ! वापरुन पहा !

६. http://www.bestechvideos.com/
तुम्हाला फोटोशॉप शिकायचे आहे ? तुम्हाला सी++ शिकायचे आहे ? काही ही शिका येथे ऑनलाईन व्हीडीओ द्वारा ! संकलन आहे वेगवेगळ्या विषयातील माहीतीचे एका जागी !

- राजे

http://www।lokayat।com/

शनिवार, २९ ऑगस्ट, २००९

स्वत:चे लेटरहेड!

वर्डचा उपयोग करून अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. अगदी स्वत:चे किंवा स्वत:च्या कंपनीचे लेटरहेडसुद्धा बनविता येते. त्यासाठी काय करावे लागते, त्याचा वेध...
.........
आज इंटरनेटवर कितीही फ्री वर्ड सॉफ्टवेअर उपलब्ध असले तरी आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डची सवय लागलेली आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डला पर्याय कोणते ते यापूवीर् आपण एका लेखात पाहिले आहे. पण या वर्डचा उपयोग आणखी किती पद्धतीने करता येतो हे फारजणांना माहीत नसते. मजकूर ऑपरेट करायला, त्यात एखादा चार्ट अथवा टेबल इन्सर्ट करायला, तसेच फोटो टाकायला वर्ड उपयोगी पडते. त्याचप्रमाणे मागील लेखात म्हटल्याप्रमाणे लेटरहेड तयार करायलाही उपयोगी पडते. यासाठी कोणी आटिर्स्ट मदतीला असण्याची गरज नाही.

प्रथम मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करा. वरती डाव्या बजूला फाइल, एडिटच्या रांगेत तिसरे बटन व्ह्यू असे असेल. त्यावर क्लिक करा. नंतर त्यातील हेडर अँड फूटरवर क्लिक करा. आपोआप तुमच्या ओपन फाइलमध्ये एक बॉक्स दिसेल. त्यात तुमचे नाव, आवश्यक असल्यास एखादे स्लोगन, स्वत:चे नाव द्यायचे नसल्यास कंपनीचे नाव टाइप करा. ते झाल्यावर वरच्या टूलबारमधून ते सेंटरला आणा. (बी आय यू या बटनांच्या लाइनमध्ये पुढे सेंटरचे बटन आहे) तुम्हाला वरच्या भागात तुमचा स्वत:चा फोटो अथवा कंपनीचा लोगो इन्सर्ट करायचा असल्यास तोही करा. मात्र हा लोगो अथवा फोटो तुमच्या मशीनमध्ये आधी सेव्ह करायला लागेल. जिथे तो इन्सर्ट करायचा असेल तिथे माऊसचा कर्सर न्या आणि वरती डावीकडे व्ह्युनंतर असलेल्या इन्सर्ट बटनावर क्लिक करा. तिथे बरीच ऑप्शन्स असतील. अगदी तारीखही इन्सर्ट करता येईल, पेज नंबर टाकता येईल अथवा एखादा डायग्रामही टाकता येईल. पण तुम्हाला आत्ता फोटो टाकायचा असल्याने 'इन्सर्ट पिक्चर'वर क्लिक करा. मग तो फोटो कुठे सेव्ह केला आहे तिथे जाऊन तो अपलोड करा. तो फोटो दिसायला लागल्यावर ज्या जागेवर असणे आवश्यक आहे तिथे नेऊन ठेवा. आणखी काही तपशील हेडिंगमध्ये द्यायचा असेल तर तो द्या, त्याचा फाँट साइझ कमीजास्त करा.

हे झाले लेटरहेडच्या वरच्या भागाचे. आता तळाला तुमचा वा कंपनीचा पत्ता आणि फोन नंबर देता येईल. त्यासाठी 'हेडर अँड फूटर' या पट्टीतच 'स्विच बिटविन हेडर अँड फूटर' यावर क्लिक करा. की पानाच्या तळाला बॉक्स तयार होईल. त्यात पत्ता व इतर तपशील द्या. त्याचा लेआऊटही आवश्यकतेनुसार करा. हे झाले की सारे पान सेव्ह करायला हवे. इथे विशेष खबरदारी घ्यावी लागेल. लेटरहेडच्या 'फाइल'मध्ये जा, 'सेव्ह अॅज' म्हणा व फाइल 'डॉक्युमेंट टेम्प्लेट' म्हणजेच डॉट फाइल म्हणून सेव्ह करा. डॉक किंवा आरटीएफ वगैरे सेव्ह करू नका. म्हणजेच फाइलला तुम्ही लेटरहेरड असे नाव दिले असेल तर 'लेटरहेड.डॉट' अशी फाइल तयार होईल. ती सेव्ह कुठे कराल? हार्डडिस्कच्या (उदा. सी ड्राइव्ह) ड्राइव्हमध्ये टेम्प्लेट असा वेगळा फोल्डर असेल त्यात सेव्ह करा. साऱ्या डॉट फाइल यातच सेव्ह केल्या तर शोधाशोध करायला लागणार नाही. या फाइलची एक कॉपी डेस्कटॉपवर करून ठेवा. जेव्हाकेव्हा लेटरहेडवर काही मजकूर टाइप करायचा असेल, तेव्हा डेस्कटॉपवरची फाइलच ओपन करा व त्यात टाइप करा. तुमच्याकडे कलर प्रिंटर उपलब्ध असेल तर चांगलेच; नसला तरी ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटरवरही स्वत:च्या लेटरहेडवरचे पत्र चांगलेच दिसेल.

लेटरहेडच्या मांडणीत आणखी विविधता आणायची असेल तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्येच वरती फाइल, व्ह्यूच्याच ओळीत फॉरमॅट म्हणून बटन असेल। (वर्ड २००३मध्ये ते आहे) त्यावर क्लिक केलेत की खाली 'थीम' असे दिसेल. त्यातली कोणतीही थीम निवडा व त्याप्रमाणे लेटरहेड तयार करा. एकच थीम कायम ठेवायची नसेल तर लेटरहेड थीमशिवाय तयार करा व पत्र पाठवतेवेळी वेगवेगळी थीम द्या. वर्डमध्ये काम करायला वेगळीच गंमत येईल.
- अशोक पानवालकर

'अपडेटेड' सॉफ्टवेअर!

'ऑटोमॅटिक मायक्रोसॉफ्ट अपडेटस्' हे ऑप्शन ऑन ठेवले, तरी ते मायक्रोसॉफ्टपुरतेच काम करते. बाकी सॉफ्टवेअर अपडेट झाले आहे हे कसे कळणार? त्याचा वेध...
....

आपण बऱ्याच वेळेला नवनवीन सॉफ्टवेअर डाऊनलोड करत असतो. बऱ्याचजणांना तो छंदच असतो. ते सॉफ्टवेअर आपल्याला खरोखरच आवश्यक आहे का, ते आपल्या मशीनच्या प्रकृतीला मानवणारे आहे का याचा फारसा कोणी विचार करत नाही. जर मशीनला ते झेपणारे नसेल तर तशी स्पष्ट सूचना मिळते. मग ते डाऊनलोड करण्याचा हट्ट सोडायला हवा. सगळे ते 'लेटेस्ट' हवे असणाऱ्यांसाठी नेटवर काही टूल्स उपलब्ध आहेत. तुमच्या मशीनमध्ये कोणते सॉफ्टवेअर अद्ययावत झाले आहे ते या सॉफ्टवेअरमुळे सांगता येते. तुम्ही 'ऑटोमॅटिक मायक्रोसॉफ्ट अपडेटस्' हे ऑप्शन ऑन ठेवले असले तरी ते फक्त मायक्रोसॉफ्टपुरतेच काम करते. बाकी सॉफ्टवेअर अपडेट झाले आहे हे कसे कळणार?

त्यासाठी तुम्ही नेटवर जा. filehippo.com ही साइट ओपन करा. तिथे सध्या 'अपडेट चेकर व्हर्जन १.०३२' उपलब्ध आहे. ती केवळ १५४ केबीची असल्याने घरी ब्रॉडबँड नसणाऱ्यांनाही पटकन डाऊनलोड करता येईल. डेस्कटॉपवर सेव्ह करा आणि नंतर त्यावर डबलक्लिक करून ती 'रन' करा. काही सेकंदांतच तुमच्या मशीनमध्ये कोणते सॉफ्टवेअर आऊटडेटेड झाले आहे त्याची लिस्टच स्क्रीनवर दिसेल. त्यातील कोणते अपडेट्स डाऊनलोड करायचे हे मात्र तुम्हालाच ठरवायला लागेल. Updastar हे आणखी एक असेच सॉफ्टवेअर. ते फाइलहिप्पोपेक्षा अधिक परिणामकारक आहे असे म्हणतात. त्यात मशीनमधले प्रत्येक सॉफ्टवेअर तपासले जाते व त्याचा रिपोर्ट मिळतो. त्याची महागडी व्हर्जन अधिक प्रभावी आहे. फुकटातली व्हर्जन आपल्याला पुरेशी आहे.

फायरफॉक्स या ताज्या दमाच्या ब्राऊझरमध्ये 'सॉफ्टवेअर अपडेट चेकर १.३' अशी सुविधा होती. परंतु, दहा दिवसांपूवीर् फायरफॉक्स व्हर्जन ३.५ उपलब्ध झाल्यानंतर हा प्रोग्राम उपयोगी ठरत नाही. तिथे हा चेकर डाऊनलोड करायला गेल्यावर 'हा प्रोग्राम फायरफॉक्सच्या जुन्या व्हर्जनलाच उपयोगी पडतो', असा मेसेज येतो आणि निराशा होते. फायरफॉक्सचा धडाका पाहता हा चेकर पुन्हा आपल्या मदतीला धावून येईल यात शंका नाही.

sumo म्हणजेच 'सॉफ्टवेअर अपडेट मॉनिटर' हेही चांगले आहे. याचे वैशिष्ट्य असे की नेमकी कोणत्या प्रकारची सॉफ्टवेअर तुम्हाला चेक करायची आहेत तेवढेच चेक करण्याची सुविधा आहे. त्यातून वेळ वाचतो आणि भरमसाठ प्रमाणात सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याचा मोहही वाचतो. याचा फाइलसाइझ दीड एमबी आहे. Securial psi हे सॉफ्टवेअर उपयुक्त असल्याचे शेरेही इंटरनेटवर वाचायला मिळतात. यातील पीएसआय म्हणजे 'पर्सनल सॉफ्टवेअर इन्स्पेक्टर'. नवीन सॉफ्टवेअरबरोबरच तुमचे मशीन सुरक्षित ठेवण्याचेही काम तो करतो, असा दावा त्यांनी केला आहे. appupdater किंवा radarsinc ही आणखी काही सॉफ्टवेअर अपडेटर आहेत. मी ही वापरलेली नाहीत. कारण मला फाइलहिप्पो हे एकच सॉफ्टवेअर पुरेसे वाटते.

सध्या फेसबुक, ऑर्कुट, ट्विटर वगैरेच्या माध्यमातून सोशल नेटवकिर्ंग करण्याचे फॅड असल्याचे ओळखून फायरफॉक्सने 'अॅडऑन' म्हणून दहा अशा साइट्सची सोय केली आहे. फायरफॉक्स ओपन केल्यावर टूल्सवर क्लिक करा व नंतर अॅडऑनवर जा. तिथे आवश्यक ते अॅडऑन लोड करून घ्या. अलीकडे कम्प्युटरविषयक बऱ्याच मासिकांच्या साइटवरून नवनवीन सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याची सोय आहे. उदा. download.chip.asia/in या साइटवर हे फायरफॉक्सचे अॅडऑन पटकन मिळतील. त्याचबरोबर अन्य असंख्य सॉफ्टवेअर मिळतील. या काही मासिकांच्या किमती शंभर ते दोनश्ेा रुपयांपर्यंत असतात. ते प्रत्येलाच परवडेल असे नाही. मग अशा वेबसाइट फायदेशीर ठरतात. अन्यथा नुसत्या Download.com या साइटवर जा. CNET.com ही आणखी एक उपयुक्त साइट. तिथे मोबाइल, लॅपटॉपपासून सगळ्या उपकरणांसाठी लागणारी माहिती मिळेल.

प्रत्येक सॉफ्टवेअर अपडेट होत असतेच आणि प्रतिर्स्पध्यासमोर नवनवीन आव्हाने उभी होतात। 'गूगल'ने 'क्रोम ऑपरेटिंग सिस्टिम' आणण्याचा निर्णय घेतला तोही याच कारणाने. मायक्रोसॉफ्टने विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम आणली. त्यानंतर अलीकडेच 'इंटेल'ने स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टिम आणण्याचा निर्णय घेतला होता. विंडोजमध्ये एक्सपी, व्हिस्ता आणि लवकरच 'विंडोज ७' येत आहे. पण वेगाच्या जमान्यात ग्राहकांना आणखी वेगवान व सुटसुटीत ऑपरेटिंग सिस्टिमची गरज वाटत होती. ती गूगल पूर्ण करील असा विश्वास त्यांना वाटतो आहे. मात्र त्यासाठी वर्षभर वाट पाहायची तयारी हवी. कारण सुरुवातीला ती प्रणाली फक्त 'नोटबुक'मध्येच घालण्यात येणार आहे. पुढील वर्षाच्या उत्तरार्धात तुमच्या घरच्या पीसीमध्ये ही सिस्टिम बसवता येईल. तोपर्यंत 'वेट अँड वॉच'...
- अशोक पानवलकर
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4786918.cms

घरच्या कम्प्युटरवर 'नजर' कशी ठेवाल?


तुम्ही ऑफिसला गेल्यावर घरचा कम्प्युटर बंद असतो असा समज करून घेऊ नका. आजकाल वडीलधाऱ्या मंडळींपेक्षा मुलेच जास्त कम्प्युटर वापरतात. त्यांनी त्याचा गैरवापर करू नये म्हणून कम्प्युटर लॉक करून जाणे अथवा त्याला पासवर्ड देणे असे उपाय आपल्याला करता येतात. परंतु, काही वेळा शाळा, कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी अथवा ऑफिसच्या कामासाठी मुलाला खरोखरच कम्प्युटरची गरज असते. तरीही आपले मूल खरोखरच कामासाठी कम्प्युटर वापरते आहे की भलतेच काही पाहण्यासाठी हे तुम्हाला कसे ओळखता येईल? मुलांनी आपल्या गैरहजेरीत कम्प्युटर किती वेळ वापरला हे कसे ओळखाल? ते ओळखता येईल. अगदी सोप्या पद्धतीने. तेही कोणतेही नवे सॉफ्टवेअर डाऊनलोड न करता!

कम्प्युटरच्या 'स्टार्ट' बटनावर क्लिक करा. कंट्रोल पॅनेलवर जा. तिथून 'अॅडमिनिस्ट्रेटिव्ह टूल्स'वर जा. त्यावर डबल क्लिक केल्यावर काही ऑप्शन्स दिसतील. त्यातल्या 'इव्हेंट व्ह्युअर'वर क्लिक करा. एक बॉक्स उघडेल. त्यातल्या डाव्या भागात 'इव्हेंट व्ह्युअर (लोकल)' असे लिहिलेल्या भागातील 'सिस्टिम'वर क्लिक करा. उजवीकडे टाइम, डेट, सोर्स, कॅटेगरी, इव्हेंट वगैरे कॉलम दिसतील. परंतु त्याने घाबरून जाऊ नका. यातली इव्हेंट कॅटेगरी महत्त्वाची आहे. या कॅटेगरीखाली वेगवेगळे आकडे दिसतील. त्यातला ६००५ हा आकडा तारखेच्या कॉलमातील तारखेला कम्प्युटर सुरू करण्याची वेळ दर्शविते तर ६००६ आकडा कम्प्युटर बंद केल्याची वेळ सांगते. इतर सर्व आकडे जाऊन फक्त कम्प्युटर सुरू आणि बंद केल्याच्याच वेळा हव्या असल्या तर? तर वरती फाइल, अॅक्शन, व्ह्यू, हेल्प या ऑप्शनपैकी व्ह्यूवर क्लिक करा. मग 'फिल्टर'वर जा. एक बॉक्स ओपन होईल. यातल्या फिल्टरमध्ये इव्हेंट आयडीच्या पुढे ६००५ किंवा ६००६ आकडे टाइप करा व ओके म्हणा. आता फक्त कम्प्युटर सुरू वा बंद केल्याच्या वेळा तुम्हाला दिसतील. मग तुमच्या गैरहजेरीत घरच्यांनी किती वेळ कम्प्युटर वापरला ते लगेचच कळेल. मुलांवर अविश्वास दाखवा असे मला सुचवायचे नाही, पण आपल्या गैरहजेरीत कम्प्युटरचा वापर होतो का हे तपासणे महत्त्वाचे आहे.

एवढे करायचे नसेल तर कम्प्युटरला स्वत:चा पासवर्ड देऊ शकताच. त्यासाठी कंट्रोल पॅनेल - यूजर अकाऊंट्स - तुमचे अकाऊंट व नंतर क्रिएट पासवर्ड या मार्गाने जाऊन पासवर्ड देऊ शकता. पण तो विसरलात तर तो रिकव्हर करण्यासाठी एखाद्या तज्ज्ञालाच बोलवावे लागेल.

काही टिप्स
आपण एखादी फाइल रिसायकल बिनमधूनही डिलीट करतो. पण क्षणार्धातच आपल्या लक्षात येते की आपण ही फाईल चुकून काढून टाकली. अशा डिलीटेड फाइल्स कम्प्युटरमध्येच असतात. पण त्या अदृष्य स्वरूपात. त्या कशा रिकव्हर कराल? साधे सॉफ्टवेअर डाऊनलोड करा. रेकुव्हा (recuva) नावाचे हे सॉफ्टवेअर चकटफु आहे आणि त्याचा साइझ आहे फक्त २.२ एमबी. तो डाऊनलोड झाला की त्यावर डबलक्लिक करा व फाइल रन करा. हार्ड डिस्क आणि मेमरी कार्डमधील सर्व फाइल्स स्कॅन होतील आणि सर्व डिलिटेड फाइल्स तुमच्या समोर येतील. त्यातली हवी ती फाइल तुम्ही 'रिस्टोअर' करू शकता.

रंगीबेरंगी मेल
तुम्ही मैत्रिणीला मेल पाठवताना तो अधिक रोमँटिक करून पाठवू शकता. ईमेलमध्ये वेगवेगळी चित्रे इन्सर्ट करू शकता आणि अॅनिमेशनचा वापरही करू शकता. त्यासाठी डाऊनलोड करा इनक्रेडिमेल (incredimail) हा प्रोग्राम. हाही चकटफु आहे आणि त्याचा साइझ आहे फक्त ५८४ केबी.

मेलवॉशर!
कम्प्युटरमध्ये व्हायरस वा स्पॅममेल येऊ नये म्हणून तुम्ही कितीही काळजी घेतलीत तरीही हा प्रकार पाहुणा म्हणून येतोच आणि त्यातले काही पाहुणे अगदी चिवट असतात। या स्पॅम मेल येऊच नयेत म्हणून काय कराल? त्यासाठी मेलवॉशर (mailwasher।net) उपलब्ध आहे. ते डाऊनलोड करा व ऑटोमॅटिक बटनवर क्लिक करा. तुमच्या मशीनमध्ये जे ईमेल सॉफ्टवेअर असेल (उदा. आऊटलूक एक्स्प्रेस) त्याची सेटिंग्ज तुम्हाला उजव्या बाजूला दिसतील. ज्या ईमेल प्रोग्रामच्या एंट्रीच्या पुढे अॅप्लिकेशन असे लिहिलेले असेल तेथे टिक करा व फिनिश म्हणा. नंतर आऊटलूक एक्स्प्रेस जेव्हा जेव्हा उघडेल, तेव्हा चेक मेल म्हटल्यावर प्रत्येक मेल चेक होऊन येईल. जी स्पॅममेल असेल ती दाखविली जाईल. ती न उघडता त्यावर राइटक्लिक करून 'अॅड टू ब्लॉकलिस्ट ' असे म्हणू शकता.
- अशोक पानवालकर
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4942874.cms

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २००९

चोर शोधून देणारी वेबसाइट

आपली स्वताची वेबसाइट किवा ब्लॉग असेल त्यावरील साहित्य कोणी चोरी करून
आपल्या साईट वर वापरत असेल तर खाली दिलेल्या साईट वरुन तुम्ही चोर शोधू शकाल।

http://copyscape.com/

उपयुक्त साइट्स ...

आपली वेबसाइट स्वतः बनवा आणि अजुन खुप काही जसे ...
आपला टूलबार कसा तयार करायचा
फ्री वेब होस्टिंग
डीलीट केलेल्या फाइलस कशा रिकोवर करायच्या
आदि खुप काही माहितीचा खजिना असलेली उपयुक्त

List of Search Engines to submit your Blog


Website Submission Services

There are many websites on the net offering free website submission services to search engines. The list of search engines are by and large the same. Some offer fee to send your URL to more than a hundred search engines. Is it necessary to have your webpage listed in all the smaller search engines? We think that Google, Yahoo! and MSN have cornered such a large share of the market that it is sufficient just to have your website listed there. However, the decision is yours to make.If you still want that you can do that that too.


  • Google
  • Yahoo! Search
  • Microsoft Live Search

  • This is for just begginers i don't think if you have good blogs and receive traffic,search engines will automatically index you and most of the small engines drive traffic from big search engines like google.

    If you want more sites get from here too

    http://selfpromotion.com/list-of-search-engines.t
    http://www.searchenginecolossus.com/

    If still want more just search for keyword 'list of search engines to submit websites' on google or yahoo you will get long list.

    http://www.anshuldudeja.com/

    गुरुवार, २० ऑगस्ट, २००९

    Free Image Hosting Sites

    List of Free Image Hosting Sites,as we have been using many free image hosting sites like photobucket,picasa,imaghack,flickr and many more to upload our pictures to them all these sites are provide free hosting of our images but they dont provide unlimited space and bandwidth,so i would like to share some sites with you so as to meet your needs or can distribute your bandwidth and space on other sites।

    Where to upload the .js files or javascript files

    so as can be used by us for running it succesfully without bandwidth problems.As i post many hacks and tricks with the usage of .js files,i was having many accounts on googlepages and geocities and use to share that bandwidth and storage with my readers but after the upcoming news that both the google and yahoo have decided to close there services of googlepages and geocities,its been difficult for me to find an good server to with enough bandwidth and share with our readers।
    So i am asking my readers now to upload these files to there own server as mine will not be working because of bandwidth problems।But many of them dont know where to upload these .js files,so i have started a list of sites to share where these .js files can be uploaded and used but these sites have limited bandwidth but its sufficient for single blog user.So you can join these below sites and use there hosting services,if it dont full fill your requirement just upload your files to different servers below to distribute the bandwidth.
    Here Goes The List :-

    1)Sigmirror:-It provides 5Gb Webspace and 7Gb Bandwidth/month

    2)Hotlinkfiles:-It provides 1Gb Webspace and 4Gb Bandwidth/month.

    3)Ripway:-It provides only 30Mb Webspace and 150Mb Bandwidth/day or 4.5Gb/month.

    4)Boxstr:-It provides 5Gb Webspace and 1Gb Bandwidth/daily.Just upload your file and get the direct link to make it work.

    4)Fileave:-It provides 30Mb Webspace and 1Gb Bandwidth.You can prefer to use it only for some of your file with usage of 1Gb bandwidth.


    I got only these sites but they are very less i would like to get more sites listed here so if you are using or knowing any other site to host .js files please leave them in comments i will update the list.
    http://www.anshuldudeja.com/

    फाईल्स आणि फोल्डर्स पासवर्ड प्रोटेक्ट

    मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट आदी फाईल्स कशा प्रोटेक्ट कराल?
    मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट आदी फाईल्स पासवर्ड प्रोटेक्ट करण्यासाठी फाईल ओपन करून फाईल अॉप्शन्समध्ये जाऊन सेव्ह अॅज करा. त्यानंतर टूल्स > अॉप्शन्स > सिक्युरिटीमध्ये जाऊन पासवर्ड एंटर करा.
    विंडोज एक्सपी फाईल्स कशा प्रोटेक्ट कराल?
    जे फोल्डर प्रोटेक्ट करायचे असेल त्यावर राईट क्लिक करून प्रॉपटर्टीज सिलेक्ट करा. अॅडव्हान्स्ड टॅबवर जाऊन "Encrypt contents to secure data" यासमोरील बॉक्सवर चेक करा. आणि पासवर्ड सेट करा.
    आता "Apply changes to this folder only" असे म्हणून पुढे जा.


    सॉफ्टवेअर्स वापरून फाईल्स आणि फोल्डर्स प्रोटेक्ट करू शकता. मोफत सॉफ्टवेअर्स साठी इथे जा ..
    http://cleanersoft.com/hidefolder/free_hide_folder.htm
    http://www.fspro.net/my-lockbox/

    शनिवार, ८ ऑगस्ट, २००९

    उपयुक्त वेबसाइट्स ..

    शैक्षणिक

    http://vidyaonline.org/arvindgupta/vsomathsmarathi.pdf

    http://vidyaonline.org/arvindgupta/vsosciencemarathi.pdf

    http://vidyaonline.org/arvindgupta/toybagmarathi.pdf
    http://arvindguptatoys.com/

    http://hi.shvoong.com/exact-sciences/chemistry/

    http://patipencil.blogspot.com/2008/03/blog-post.html

    Click-N-Learn Computer

    www.kids-online.net/learn/c_n_l.html

    www.gcflearnfree.org/computer/

    सोमवार, २७ जुलै, २००९

    गाण्यांचे रींगटोन्स

    गाण्यांचे रींगटोन्स ठेवण्यास सर्वांना आवडते। तशी MP3 गाणी जशीच्या तशी रींगटोन म्हणुन ठेवता येतातच. पण यातला मुख्य प्रॉब्लेम म्हणजे, मोबाइल वाजल्यावर गाण्यांचे मुख्य शब्द ऐकु यायच्या आधी बराच वेळ बॅकग्राउंड म्युझीकच ऐकु येते. झेडगे.कॉम च्या सहाय्याने आपण गाण्यातला आवडता भागच रींगटोन म्हणुन निवडु शकतो. चला तर मग पाहुया, झेडगे।कॉम च्या सहाय्याने मोफत रींगटोन कशी बनवायची ते. १. zedge.com वर तुमचे मोफत अकाउंट उघडा आणि लॉग्-इन करा. २. "Ringtone maker " वर क्लिक करा. ३. आता गाणे अपलोड करण्यास सांगण्यात येइल. तुम्हाला ज्या गाण्याची रींगटोन बनवायची आहे, ते गाणे संगणकामध्ये जेथे आहे तीथे जाउन (browse)सीलेक्ट करा. ४. जवळपास सर्वच फॉर्मॅट्स (MP3, wav etc.) येथे स्वीकारले जातात. ५. एकदा पुर्ण गाणे अपलोड झाले की रींगटोन बनवण्यासाठीचे टुल (MP3 cutter) स्क्रीनवर दीसु लागेल. ६. या टुल वरील "MOVE" या बटणाच्या सहाय्याने गाण्यातील तुमचा आवडता भाग सीलेक्ट करा. (स्पीकर्स चालु ठेवण्यास विसरु नका) ७. तुमचा गाण्यातील आवडता भाग निवडुन झाल्यानंतर त्याची रींगटोन बनवण्यासाठी "DONE" या बटणावर क्लिक करा. ८. आता तुमची आवडती रींगटोन तयार झालेली असेल. तेथेच "PC Download" चा पर्याय दीसेल त्यावर क्लिक करुन ही नविन रींगटोन तुमच्या संगणकामध्ये सेव्ह करुन घ्या. आता ही रींगटोन आपल्या मोबाइलवर अपलोड करुन इतरांना ऐकवा. कोणत्या गाण्याची रींगटोन बनवायला तुम्हाला आवडेल ते मला कंमेंट्स मध्ये लिहुन कळवा. मी त्यानुसार रींगटोन बनवुन इमेल करेन. अगदी चकटफु (Free)!

    स्टायलिश फाँट्स

    या साईटवरुन हजारो स्टायलीश फाँट्स मोफत डाउनलोड करता येतात.
    १. दाफाँट्स मध्ये हजारो विविध फाँट्समधुन तुम्हाला फाँट्स निवडता येतात. मुख्य म्हणजे विविध प्रकारच्या गटांमध्ये हे फाँट्स विभागले आहेत त्यामुळे आपल्या आवडीची फॉंट स्टाइल शोधणे सोपे जाते.
    २. वैयक्तीक तसेच व्यावसायीक अशा दोन्ही प्रकारच्या वापरासाठी खुले असणारे भरपुर फाँट्स येथे उपल्ब्ध आहेत.
    ३. फाँट्सच्या सोबत येथे अनेक प्रकारची चित्रे मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. या चित्रांच्या तसेच फाँट्सच्या सहाय्याने लोगो डीझाइन करणे आतीशय सोपे आहे.
    ४. युजर्स म्हणजे ही साईट वापरणारे तुम्ही-आम्ही देखील आपले फाँट्स येथे अपलोड करु शकतो.
    ५। आपले नाव किंवा इतर मजकुर लिहुन तो दीलेल्या सर्व फाँट्समध्ये कसा दीसतो ते पाहण्याची देखील येथे सोय आहे. त्यामुळे फाँट डाउनलोड करण्याआधी कसा दीसतो ते पाहता येइल.
    http://www.dafont.com/

    शनिवार, ११ जुलै, २००९

    ई-लर्निंग अभ्यासक्रम

    जगभर आता इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ लागले आहेत. यासाठी नवीन अध्ययन-अध्यापन पद्धती आणि त्यासंबंधीचे संशोधन पुढे ये
    ऊ लागले आहे. शिक्षणशास्त्र आणि तंत्रविज्ञान यांची अचूक सांगड घालण्याचे काम शैक्षणिक तंत्रविज्ञान म्हणजेच Education Technology हे क्षेत्र करते. अनेक देशांमध्ये विद्यापीठीय स्तरावर एज्युकेशनल टेक्नॉलॉजी विषयामध्ये संशोधन आणि अभ्यास सुरू आहे. विद्यापीठ स्तरावर या प्रकारचा अभ्यासक्रम देणारं एकमेव विद्यापीठ आहे ते एसएनडीटी. एसएनडीटीच्या जुहूतील कॅम्पसमध्ये एज्युकेशनल टेक्नॉलॉजी विभागातफेर् दिली जाणारी MET-CA ही मास्टर्स पदवी याच विषयातील आहे.

    मास्टर्स इन एज्युकेशनल टेक्नॉलॉजी-कॉम्प्युटर अप्लिकेशन्स MET-CA हा पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम आहे. ऑनलाइन लर्निंग, मल्टिमिडिया इन एज्युकेशन या विषयांसाठी लागणारी सर्व कौशल्ये या अभ्यासक्रमातून शिकवली जातात. एखादा अभ्यासक्रम इ-लर्निंगद्वारे कसा शिकवायचा हे या अभ्यासक्रमातून शिकवलं जातं. विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, प्रौढांना शिकवण्याची तंत्रं, आशय मांडण्याची तंत्रं, अध्ययनाच्या विविध पद्धती, स्वाध्याय तयार करण्याची तंत्र, संगणकासाठी स्क्रीन डिझाइन, दूरस्थ शिक्षण, मुक्त शिक्षणसाहित्य, ग्राफिक्स आणि अॅनिमेशनचे नियोजन, इन्स्ट्रक्शनल डिझाइनच्या पद्धती आणि तंत्रं, अध्यापनाची इंटरनेटवर उपलब्ध असलेली साधनं, वेबडिझाइनची कौशल्यं, वेबसाइटचा अभ्यास आणि निमिर्ती प्लॅश, ड्रीमवेव्हररखी सॉफ्टवेअर्स आदी अनेक विषय दोन वर्षांच्या कालावधीत हाताळले जातात. पदवी अभ्यासक्रमाची माहिती आणि अर्ज www.det.sndt.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. संपर्क : २६६०२८३१.

    गुरुवार, ९ जुलै, २००९

    एका क्लिकसरशी... ई-लर्निंग

    जगप्रसिध्द मॅनेजमेण्ट गुरूंकडून मॅनेजमेण्टचे फण्डे घरबसल्या शिकणं शक्य आहे का? आपल्याला एखाद्या शब्दाचं स्पेलिंग आठवेनासं झालं, तर कपाटातली डिक्शनरी न काढता कुणी मदतीला येईल का? तुम्ही व्हर्चुअल क्लासरुमचे विद्यार्थी झालात, तर या सगळ्या गोष्टी एका क्लीकसरशी साध्य होतात. आता कम्प्युटर घरोघरी आलेत आणि इंटरनेटही. त्यामुळेच ई-लर्निंगचा फायदाही तुम्ही जाणून घ्यायलाच हवा.

    वाचता वाचता एखादा इंग्रजी शब्द खड्यासारखा टोचला तर काय कराल? फारतर तो शब्द (खडा) गिळाल किंवा त्याचा अर्थ धुंडाळण्यासाठी डिक्शनरी शोधाल. डिक्शनरी नाहीच मिळाली तर काय? सरळ तुमचा पीसी ऑन करा... आणि त्याच्याशी शेपूट जोडून बसलेल्या माऊसचा ताबा घ्या... इंटनेटवर गुगलवर 'टोचलेल्या' शब्दाच्या अर्थासह तो वाक्यात योग्य पद्धतीने कसा वापरायचा याच्या व्याकरणासह टीप्स देणाऱ्या हजारो साईट्स तुमच्या स्क्रीनवर वाहू लागतील... केवळ डिक्शनरीच नव्हे तर तुमच्या आवडीच्या एक्सपर्ट प्रोफेसर्सची लाईव्ह लेक्चर्स पाहण्याची, त्यातून शिकण्याची ताकद त्या इवल्याश्या माऊसने कमावली आहे. ही ताकद सामावली आहे ती 'ई-लर्निंग' या छोट्याश्या शब्दांत!

    ई-लर्निंग (इलेक्ट्रॉनिक लर्निंग) म्हणजे कम्प्युटर आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्हिडिओ स्क्रीन कॅप्चर, एमपी थ्री प्लेअर, वेबसाईट्स अशा अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या साह्याने शिक्षण घेणं! डिस्टन्स लर्निंग, व्हर्चुअल क्लासेस हा ई-लनिर्ंगचाच एक भाग! ई-लर्निंगची आंतराष्ट्रीय बाजारपेठ २००८मध्ये २१ बिलियन डॉलरची असेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

    इंजिनीअरिंग, मेडिकल, लॉ या क्षेत्रात भासणाऱ्या दर्जेदार शिक्षकांच्या कमतरतेवरही ई-लर्निंग हा चांगला पर्याय ठरू शकतो, असं महाराष्ट्र नॉलेज कॉपोर्रेशनचे कार्यकारी संचालक विवेक सावंत यांना वाटतं. आयआयटीसारख्या शिक्षणसंस्थाही या प्रश्नापासून दूर नाहीत. एका शिक्षणसंस्थेतील तज्ज्ञ शिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा इतर संस्थांतील विद्यार्थ्यांनाही व्हावा, या दृष्टीने 'व्हर्चुअल क्लासेस' ही संकल्पना आता कुठं रुजू लागली आहे..

    आयआयटीसारख्या शिक्षणसंस्थांनी या क्षेत्रात चांगलीच आघाडी घेतली आहे. एज्युसॅटच्या माध्यमातून आयआयटीतील शिक्षकांची व्हिडिओ चित्रिकरण केलेली लेक्चर्स पाहण्याची संधी इतर कॉलेजातील विद्यार्थ्यांना मिळते. मुंबईसह सातही आयआयटीजमध्ये त्यासाठी अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रात केवळ कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे इथेच आयआयटीच्या शिक्षकांचं लाईव्ह स्क्रीनिंग पाहता येतं. याच प्रकारची सुविधा 'मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' (एमआयटी) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणसंस्थेने उपलब्ध करून दिली आहे. एमआयटीच्याच वेबसाईटवर देशभरातील आयआयटीसारख्या दजेर्दार शिक्षणसंस्थांच्या ऑनलाइन लेक्चर्सच्या लिंकेजेसही उपलब्ध आहेत.

    इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटतर्फे (आयसीएआय) डिजिटल फॉरमॅट आणि र्व्हच्युअल क्लासेसच्या माध्यमातून ई-लर्निंगची संकल्पना राबवण्यात येत आहे. तर कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने (सीआयआय) एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांकरिता eshikshaindia.in पोर्टल सुरू केलंय. १२ ते १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील कठीण प्रश्नांची उत्तरं मल्टिमीडिया, व्हॉईस ओव्हर, अॅनिमेशन आणि आलेखांच्या साहाय्याने सोडवण्यास हे पोर्टल मदत करतं. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्लिश, भूगोल या विषयाशी संबंधित शंकांचं समाधान करण्याकरिता या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.

    बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्सेसमध्ये (बिट्स पिलानी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांच्या शंका दूर केल्या जातात. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तकं उपलब्ध करून देऊन बिट्स पिलानीनं मोठीच आघाडी घेतली आहे. केवळ विद्याथीर्च नव्हे तर विप्रोसारख्या कंपन्याही नामवंत शिक्षणसंस्थांशी टायअप करून ई-लर्निंगच्या माध्यमातून आपल्या स्टाफच्या कण्टिन्युइंग एज्युकेशनसाठी प्रयत्न करत आहेत.

    अजून तरी भारताचा ई-लर्निंगमधील सहभाग फारच नगण्य आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतातील शिक्षणसंस्था ई-लनिर्ंगच्या क्षेत्रात अजूनही बाल्यावस्थेतच आहे. विद्यार्थ्यांना आथिर्क मोबदल्यात ऑनलाईन स्टडी मटेरियल उपलब्ध करून देणा-या खासगी कंपन्या तशा प्रचंड आहेत. पण, यात शिक्षणसंस्थांचा सहभाग अत्यंत मर्यादित म्हणता येईल.

    मॅकॅन्सी-नॅसकॉमच्या अहवालानुसार भारतात उच्च शिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी २३ टक्के विद्यार्थी डिस्टन्स एज्युकेशन घेत आहेत. परंतु आताच्या घडीला काही ठराविकच शिक्षणसंस्था कम्प्युटर किंवा इंटरनेटचा डिस्टन्स लनिर्ंगसाठी वापर करताहेत. डिस्टन्स एज्युकेशन घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या २०१० पर्यंत ४० टक्क्यांवर नेण्याची केंद सरकारची योजना आहे. डिस्टन्सला प्रवेश घेणारे विद्यार्थी हे बहुतांशी नोकरी करता करता शिक्षण घेणारे असतात. म्हणूनच, कमी पैशात घरच्या घरी कम्प्युटरवर शिक्षण घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता शिक्षणसंस्थांनी या क्षेत्रातील आपला सहभाग वाढवण्याची गरज आहे. लवकरच हे चित्र पालटेल अशी अपेक्षा व्यक्त होतेय. dmoz.org/reference/education/distance-learning, dmoz.org/reference/education/instructional-techonology

    या वेबसाईटवर डिस्टन्ट लर्निंग घेऊ इच्छिणा - या विद्यार्थ्यांकरिता माहितीचा खजिनाच आढळतो. ज्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंगद्वारे शिकण्याची वा आपल्या माहिती-ज्ञानाचा विस्तार करायची इच्छा आहे, त्यांच्याकरिता काही उपयुक्त वेब-साईट्स...

    १) e-learningcenter.com

    २) virtualstudies.net

    ई - लर्निंगचे फायदे

    १)ऑनलाईन डिक्शनरी, इंग्रजी व्याकरण या विषयी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सुविधा कमी वेळेत वापरणं शक्य होत असल्याने संपर्काची भाषा सुधारते.

    २)सादरीकरणाच्या पारंपरिक 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' (फळा आणि खडू) साधनांऐवजी अत्याधुनिक तंत्रं वापरता येतात. उदा. पॉवरपाईंट प्रेझेन्टेशन, ग्राफिक्स, डिझाईन्स, ऑडिओ-व्हिडिओचा वापर यामुळे विषय समजणं सोपं होतं.

    ३)इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापरामुळे वेळ वाचतो. एका क्लिकच्या झटक्यात माहितीचा खजिना उलगडतो.

    ४)जगातील कुठल्याही भागातून शिक्षक वा तज्ज्ञांकडून ज्ञानाची देवाण-घेवाण करता येते.

    ५)केवळ विद्याथीर्च नव्हे तर मेडिकल, इंजिनीअरिंग आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांनाही ई-लनिर्ंगद्वारे निरंतर शिक्षण (कण्टिन्युइंग एज्युकेशन) घेऊन आपल्या ज्ञानाचं अपडेटिंग करता येणं शक्य आहे.

    -marathigyaan

    प्रश्नोत्तरे

    १) माझ्या संगणकावर मी काही गुप्त डेटा ठेवला आहे. त्यात फोटो, पत्रे म्हणजे मजकूर वगैरे डेटा आहे. ह्या डेटाच्या फाईल्स मला पासवर्ड प्रोटेक्ट करून ठेवायच्या आहेत. यासाठी विंडोजमध्ये काही सोय आहे का? किंवा एखादे मोफत सॉफ्टवेअर त्यासाठी आहे का? - श्याम गव्हाणकर (पनवेल)

    -तुम्हाला तुमच्या संगणकावरील डेटा पासवर्ड प्रोटेक्ट करता येईल. पण पासवर्ड विसरलात तर अवघड होईल. त्यामुळे पासवर्ड लक्षात ठेवण्याचं तेवढं लक्षात ठेवा.
    तुम्ही जर Windows XP वापरत असाल (आणि तुमची फायलींग सिस्टम NTFS प्रकारची असेल) तर खुद्द विंडोजमध्ये तुम्ही तुमच्या फाईल्स पासवर्ड प्रोटेक्ट करू शकता. त्यासाठी खालील कृती कराः
    - जो फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट करायचा त्यावर राईट क्लीक करा.
    - राईट क्लीक केल्यानंतर येणार्‍या ड्रॉप डाऊन मेनूतील Properties वर क्लीक करा. तुमच्यापुढे खालील विंडो येईल. ह्या विंडोमधील Sharing ह्या टॅबवर क्लीक करा.



    त्यानंतर Local Sharing and Security च्या खालील Make this folder private च्या छोट्या बॉक्समध्ये क्लीक करून तो सिलेक्ट करा.
    - त्यानंतर Apply वर क्लीक करून OK करा.
    टीपः Make this folder private हे शब्द आणि त्याचा बॉक्स वरील विंडोत दिसत असल्याप्रमाणे ग्रेआऊट झालेला दिसतो आहे का? म्हणजे, त्यावर क्लीक होऊ शकत नसेल तर तुमची फायलींग सिस्टम Fat 32 प्रकारची आहे. NTFS प्रकारची नाही. तसं असल्यास तुम्हाला ह्या पद्धतीने फोल्डर्स पासवर्ड प्रोटेक्ट करता येणार नाहीत.
    तसं असल्यास, MaxCrypt हे सॉफ्टवेअर वापरून फोल्डर वा फाईल्स पासवर्ड प्रोटेक्ट करता येतील.
    http://www.kinocode.com/download/MSS_v2_Setup.exe
    वरील लींकवर क्लीक करा म्हणजे MaxCrypt 2.0 डाऊनलोड होईल. ते इन्स्टॉल करा. त्यानंतर राईट क्लीक करून तुम्हाला फाईल्स व/वा फोल्डर्स पासवर्ड प्रोटेक्ट करता येतील. ३.८ एम.बी. आकाराचं हे सॉफ्टवेअर फाईल्स व फोल्डर्स Encrypt करतं. पासवर्ड दिल्याशिवाय ते Decrypt होऊ शकत नाही. ह्या संदर्भातील अधिक माहिती http://www.kinocode.com वर मिळू शकेल.

    -माधव शिरवळकर

    प्रश्नोत्तरे

    १) तुम्ही नेहमी चांगली आणि मोफत सॉफ्टवेअर सुचवता. Parental Control साठीचं असं एखादं सॉफ्टवेअर सुचवाल का? दिवसभर नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असणार्‍या आमच्यासारख्या पालकांना इंटरनेटची खरंच काळजी असते. मुलांनी आमच्या अनुपस्थितीत अभ्यासासाठी, मनोरंजनासाठी, चॅट किंवा ईमेलसाठी वगैरे इंटरनेट अवश्य वापरावं. पण त्यांनी 'नको ते ' बघू नये असं सर्वच पालकांना वाटणं स्वाभाविक आहे. मला काहींनी यासाठी Parental Control साठीचा प्रोग्राम लावायला सांगितला. पण मला त्याबद्दल फारसं माहीत नाही. तुम्ही काही सुचवाल का? तुमच्या उत्तराचा खूप पालकांना फायदा होईल. - मधुकर करवीर (बेळगाव)
    -Parental Filter ह्या नावाचं मोफत आणि माझ्या मते उत्तम असं सॉफ्टवेअर तुमच्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध आहे. http://www.ecommsec.com/pf/PfSetup30.exe ह्या लिंकवर क्लीक केलत की Parental Filter चा डाऊनलोड सुरू होईल. केवळ २.१ एम.बी. आकाराचं हे डाऊनलोड आहे. त्यामुळे ते पटकन डाऊनलोड होतं. डाऊनलोड पूर्ण झाल्यानंतर इन्स्टॉल करा.
    त्यातील वरच्या बाजूस असलेल्या उजवीकडील लाल आयतावर (Banlist Off) वर क्लीक करा. म्हणजे तो चौकोन हिरवा होईल आणि Banlist On होईल. याचा अर्थ तुमचं Parental Filter चालू झालं. Pornography किंवा अश्लील प्रकारच्या वेबसाईटस उघडायचा प्रयत्न झाल्यास त्या उघडणार नाहीत. Page can not be displayed असा संदेश मिळेल.
    Parental Filter ने हजारो पोर्न व तत्सम साईटसची यादी केली आहे, आणि त्यांचा समावेश Banlist मध्ये केला आहे. दरमहा त्यात नवनव्या साईटसची भर पडत असते. त्यामुळे तुम्ही Banlist महिन्यातून एकदा जरूर अपडेट करा.
    आता, शेवटची पण सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे पासवर्डची. तुम्ही लावलेलं Parental Filter कुणीही काढू नये यासाठी पासवर्डची व्यवस्था आहे.विंडोमध्ये तुमचा पासवर्ड द्या.
    हा प्रोग्राम बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. पण तो फार मोठ्या प्रमाणावर साईटस बॅन करतो अशी टीका काही जण करतात. ज्या अर्थी तो लोकप्रिय आहे, त्याअर्थी आपण टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे हेच बरे.
    -माधव शिरवळकर

    बुधवार, ८ जुलै, २००९

    उत्तम वेब साईटस..

    http://www.rarebookroom.org/

    एक शैक्षणिक साईट. ओक्टाव्हो ह्या कंपनीने जगभरातील दुर्मिळ पुस्तकांचा मागोवा घेतला आणि त्या पुस्तकातील प्रत्येक पानाचे छायाचित्र घेतले. ही छायाचित्रे अत्यंत हाय रिझोल्युशनची आहेत. एका पानाचा आकार २०० एम.बी. पर्यंत गेल्याची माहिती ही साईट पुरवते. १४५५ साली गटेनबर्गने छापलेलं बायबल आपल्याला इथे पहायला मिळतं. गॅलिलीओ, केप्लर, आईनस्टाईन, न्युटन, कोपर्निकस, डार्विन वगैरे शास्त्रज्ञांची पुस्तके इथे आहेत. लक्षात घ्या की ही प्रत्यक्ष पुस्तकाची (पानापानांची) छायाचित्रे आहेत. दुर्मिळ पुस्तक प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद इथे मिळतो.

    http://www.kosmix.com/

    हे खरं तर एक वैशिष्ट्यपूर्ण सर्च इंजिन आहे. अत्यंत उपयुक्तही आहे. गुगलच्या प्रचंड ढिगार्‍यातून टाचणी शोधत बसण्यापेक्षा इथे जावं. हवी ती टाचणी पटकन मिळण्याची शक्यता इथे जास्त. Auto, Travel, Health, Finance, Politics आणि Video Games हे विभाग इथे आहेत. ह्या विभागाच्या अंतर्गत माहितीची मांडणी नेटकेपणाने करण्यांत आली असल्याने हे त्या विशिष्ट विषयांचे अत्यंत सोयीस्कर असे सर्च इंजिन बनले आहे.

    http://www.topix.net/

    बातम्या पटापट शोधून देणारं हेही एक सर्च इंजिनच. बातम्यांना वाहिलेलं आणि भौगोलिक दृष्ट्या बातम्यांचा शोध उत्तमरित्या घेण्याची सोय इथे आहे.
    पौराणिक बाबींचा प्रचंड ज्ञानकोश. Encyclopedia Mythica म्हणून त्याचे इंटरनेटवरील स्थान अद्वितीय आहे. ७००० हून अधिक लेख ह्या ज्ञानकोशात असल्याचा ह्या साईटचा दावा आहे. हिंदू पौराणिक विभागात ३३० लेख आहेत. त्याची लिंक http://www.pantheon.org/areas/mythology/asia/hindu/articles.html ही आहे. कायम बुकमार्क करावी अशी ही साईट आहे.

    http://sanskritdocuments.org/marathi/

    एका मोठ्या साईटचा हा महत्वपूर्ण विभाग. मराठी भाषेतील पुस्तके आणि इतर साहित्याचा. संपूर्ण ज्ञानेश्वरी, संपूर्ण दासबोध, हरिपाठ, मनाचे श्लोक ह्या धार्मिक ग्रंथांव्यतिरिक्त मराठीशी संबंधित अनेक उपयुक्त लिंक्स इथे आहेत. मूळ sanskritdocuments.org ही साईट तर प्रचंड संदर्भ साहित्याने भरलेली आहे. आपल्या यादीत ह्या साईटस हव्यातच.

    http://mr.wikipedia.org/wiki/

    सर्वांना माहीत असलेली आणि कदाचित सर्वजण कधी ना कधी तिथे गेले आहेत अशी ही मराठी विकीपेडियाची साईट. ज्यांनी इथे भेट दिलेली नाही त्यांनी ताबडतोब तिथे जावे. १०००० हून अधिक मराठी लेख असलेला हा जगाचा, जगाने जगासाठी तयार केलेला ज्ञानकोश आहे.


    http://www.urbanfonts.com

    अप्रतिम आणि विविध विषयांवरचे Dingbat Fonts (मोफत अर्थातच) हे ह्या साईटचे वैशिष्ट्य. इतर उत्तम फॉंटसचा खजिनाही सोबत आहेच. फॉंटप्रेमींना प्रभावित करेल अशी साईट.

    http://www.sxc.hu/

    हंगेरी देशातली साईट. २,५०,००० हून अधिक मोफत (आणि उत्तम दर्जाची) छायाचित्रे डाऊनलोडींग साठी देणारी. अतिशय High Resolution असलेली ही छायाचित्रे खरोखरीच प्रेक्षणीय आहेत. विविध विषयांवरील छायाचित्रांचे वर्गीकरण करण्यांत आले आहे. मोफत रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असले तरी त्याचे चीज करणारी ही साईट आहे.

    http://www.webmd.com/

    रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना उपयोगी पडेल अशी माहिती देणारी ही साईट. विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या (A ते Z याप्रमाणे अक्षरशः शेकड्याच्या संख्येने), अलर्जीपासून ते योगा आणि एक्स-रे पर्यंत माहितीचा खजिना इथे आहे.

    http://www.librarything.com/

    एक जबरदस्त उपयुक्त साईट. Web 2.0 ची झलक दाखवणारी. Catalogue your books online असे ब्रीदवाक्य आपल्या पहिल्या पानावर मिरवणारी. आपल्या घरातील पुस्तकांची यादी ह्या साईटवर ठेवता येते. लेखक, नाव, प्रकार वगैरे निकषांवरून पुस्तकांचा त्वरित शोध घेण्याची सोय अर्थातच आहे. युनिकोड कॉंप्लायंट असल्याने मराठी पुस्तकांची यादी आणि त्यांचा शोधही इथे शक्य होतो. महत्वाची गोष्ट म्हणजे भाषांच्या यादीत 'मराठी' चा समावेशही आहे.

    http://www.instructables.com/

    स्वतःचे केस कसे कापावेत पासून ते आपल्या LCD मॉनिटरचा उपयोग टीव्ही सेट म्हणून कसा करावा इथपर्यंत अक्षरशः शेकडो कृतींचा ज्ञानकोश म्हणजे ही साईट. प्रत्यक्ष पाहणं ही एक कृती आपण केली की ही साईट आपल्यापुढे घरगुती कृतींपासून ते कॉंप्युटर टेक्नॉलॉजीपर्यंत सारं काही 'प्रॅक्टीकली' पेश करते.

    http://www.webdesignfromscratch.com/

    वेब डिझायनर्ससाठी कायम संदर्भाची साईट. तसेच ज्यांना वेब डिझायनिंग अगदी पहिल्यापासून शिकायचं आहे त्यांच्यासाठीही ही उत्तम सोय आहे. Web 2.0 सह खूपच महत्वाची आणि अद्यावत माहिती देणारी ही साईट अतिशय विश्वासार्ह मानली जाते.

    http://www.space.com/scienceastronomy/101_earth_facts_030722-1.html

    अफाट माहिती. आपल्या पृथ्वीबद्दलची. फक्त १०१ प्रश्नांच्या उत्तरातून अफाट ब्रम्हांड उलगडून दाखवलय. काही प्रश्नांची उत्तरे डोकं चक्रावून टाकणारी आहेत. हे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पहा-
    जगातील सर्वांत कोरडी जागा कोणती?
    - चिली देशातील अरिका प्रांतात दरवर्षी ०.०३ इंच पाऊस पडतो. ह्या पावसाच्या पाण्याने कॉफीचा कप भरायला ठेवला तर शंभर वर्षे लागतील.
    जगातील सर्वांत ओली जागा कोणती?
    -कोलंबियातील लोरो प्रांतात ५२३.६ इंच पाऊस दरवर्षी पडतो. २६ जुलै रोजी मुंबईत जो प्रचंड पाऊस झाला त्यावेळी सांताक्रुझ वेधशाळेने २४ तासात प्रचंड म्हणजे ३७ इंच पाऊस झाल्याची नोंद केली होती.
    हे आणि असे आणखी ९९ प्रश्न व त्यांची उत्तरे ह्या साईटवर वाचा.

    इंटरनेटवर मराठी ते इंग्रजी ऑनलाईन देणारी डिक्शनरी

    http://dsal.uchicago.edu/dictionaries/vaze/

    जगभरातील सर्व सत्ताधीशांचे तयार (आणि अद्ययावत) संदर्भ
    rulers.org ही वेबसाईट म्हणजे राजकीय संदर्भांच्या दृष्टीने एक खजिना आहे. ताजी बातमी म्हणजे, उत्तर प्रदेशात मायावती मुख्यमंत्री झाल्या त्या चार दिवसांपूर्वी. पण ती नोंदही rulers.org ने घेऊन ठेवली आहे. थोडक्यात काय, तर rulers.org ही सातत्याने आणि त्वरेने अपडेट होणारी वेबसाईट आहे.
    ह्या साईटवर जगातल्या सर्व देशांच्या सत्ताधीशांची अशा प्रकारे अद्ययावत माहिती
    मोफत उपलब्ध आहे. सातत्याने अपडेट केली जात असल्याने ह्या साईटचे महत्व
    एखाद्या ज्ञानकोशासारखे आहे.
    १९९६ ते आज २००७ म्हणजे गेल्या संपूर्ण दशकाच्या जागतिक राजकीय इतिहासाचा
    लेखाजोखा इथे उपलब्ध आहे. उदाहरणार्थ १७ जुलै १९९६ ची ही नोंद पहाः
    ज्या १७ जुलै १९९६ ह्या तारखेस पी.सी. अलेक्झांडर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना गोव्याचे राज्यपालपद ग्रहण केले त्याच दिवशी रशियात अध्यक्षपदी असलेल्या बोरिस येल्तसिन यांनी ऐगोर रोडिनोव यांना रशियाचे संरक्षणमंत्रीपद दिले.
    सांगायची गोष्ट म्हणजे, १९९६ ते २००७ चा हा मे महिना ह्या दरम्यानच्या प्रत्येक तारखेच्या जागतिक राजकारणातील सत्तेसंबंधीच्या घडामोडी ह्या साईटने नोंदवलेल्या आहेत. छायचित्रेही फार मोठ्या प्रमाणावर आहेत. जगातल्या २५० हून अधिक देशांतील सर्व राज्ये व इलाक्यांतील सत्तेच्या नोंदी सातत्याने अद्यावत राखणारी ही वेबसाईट मुख्यत्वे देणग्यांवर चालते.


    http://www.sosmath.com/tables/tables.html

    गणित विषयक एक चांगली साईट. लॉगॅरिथमपासून ते ट्रिगॉनॉमेट्रिकल आयडेंटीटी पर्यंत अनेक कोष्टके इथे उपलब्ध करण्यांत आली आहेत. ती एक्सेल फाईल म्हणूनही तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता.


    http://www.whimsy.org.uk/superstitions.html

    अंधश्रद्धांची लांबलचक आणि अत्यंत मनोरंजक यादी. मोराचं पिस घरात लावणं म्हणे अशुभ असतं, तर हंसाचं पिस नवर्‍याच्या उशीत लावल्यास तो पत्नीशी एकनिष्ठ राहतो, वगैरे वगैरे. धमाल आहे.

    -माधव शिरवळकर

    प्रश्नोत्तरे

    १) माझ्या संगणकावरच्या फाईल्स चुकून डिलीट झाल्या आहेत. Recycle Bin मधूनही त्या काढून टाकल्या आहेत. त्या परत हव्या असतील तर काय करायचं?

    - -Recycle Bin मधून फाईल्स डिलीट झाल्या तर त्या परत मिळवता येत नाहीत अशी बर्‍याच जणांची समजूत असते. Recycle Bin ही Windows ची एक डिरेक्टरी आहे. डिलीट केलेल्या फाईल्स इथे आणल्या जातात. जेव्हा आपण Recycle Bin मोकळी म्हणजे Empty करतो तेव्हा त्या Windows मधून काढून टाकल्या जातात. मात्र त्यांची मुळे संगणकावर अस्तित्वात असतात. ज्यावेळी ह्या मुळांवर दुसर्‍या फाईल्स चढतात तेव्हा ती मुळे नाहीशी होतात. त्यानंतर मात्र फाईल्स परत मिळू शकणं जवळजवळ अशक्य असतं. Recycle Bin मधूनही गेलेल्या तुमच्या फाईल्स परत मिळविण्यासाठी Undelete Plus नावाचा मोफत उपलब्ध असणारा प्रोग्राम तुम्ही वापरायला हवा. www.undelete-plus.com ह्या साईटवरून तुम्ही तो डिलीट करू शकता.

    मराठी फाँट

    मराठी फाँटस् विकत घ्यावे लागतात, ते ५०००/- ते ३०,००० रूपयांपर्यंतच्या किंमतीचे असल्याने खिशाला भगदाड पाडणारे असतात. त्यामुळे ते विकत घेण्यापेक्षा पायरेटेड कॉपी मिळवण्याची धडपड ही केव्हाही चातुर्याचीच वाटते.
    आपल्याकडील मराठी फाँटचे पॅकेज रितसर विकत घेतलेले असो की पायरेटेड असो, आपल्याला त्या पॅकेजमध्ये असलेल्या फाँटमध्येच व्यवहार करता येतो ही मर्यादा आपल्याला कायम भेडसावत असते. म्हणजे, वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आकृतीचे पॅकेज असेल तर आपण आकृती ब्रॅंडपुरतेच मर्यादित असतो. श्रीलिपी ब्रॅंडचा मजकूर आला की आपण गडबडतो. कारण आकृती आणि श्रीलिपी हे दोन्ही मराठी फाँट असले तरी जणू दोन वेगळ्या भाषांतले असावेत इतके भिन्न असतात. अशा वेळी श्रीलिपीचा मजकूर आपल्या आकृती ब्रॅंडच्या फाँटमध्ये रूपांतरित कसा करावा याची समस्या आपल्याला सतावत असते. असं रूपांतरण करणारे सॉफ्टवेअर कुठेतरी उपलब्ध आहे असं आपण ऐकलेलं असतं. पण ते नेमकं कोणतं सॉफ्टवेअर हे माहित नसतं. इंटरनेटवर शोधूनही ते खूपदा सापडत नाही. सारांश आपला गोंधळ कायम असतो.
    खरं तर आज मराठीची फाँटची समस्या अधिकृतपणे सुटलेली आहे. भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याने ती उत्तमरित्या सोडवली आहे. त्यामुळे गोंधळाचे वातावरण असण्याची काहीही आवश्यकता नाही.
    आज कोणालाही मराठी फाँट विकत घेण्याची गरज नाही. कारण केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याने उत्तम मराठी फाँट त्यांच्या www.ildc.in ह्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध केले आहेत. ह्या फाँटची चाचणी मी घेतली आहे, आणि गेले काही महिने मी तेच फाँटस माझ्या मराठी टायपिंगसाठी वापरतो आहे. थोडक्यात, आता मराठी फाँटसाठी ५,००० ते ३०,००० टाकण्याची, वा खिशाला भगदाड पाडून घेण्याची कसलीही आवश्यकता नाही. केंद्र सरकारचे हे मराठी फाँटस तुम्हाला दोन प्रकारे मिळू शकतात. एक म्हणजे www.ildc.in ह्या साईटवरून तुम्ही ते मोफत डाऊनलोड करून घेऊ शकता, आणि दुसरं म्हणजे ह्याच वेबसाईटवर मोफत नोंदणी करून तुम्ही ह्या फाँटची सीडी पोस्टाने मोफत मागवू शकता. पोस्टाने पाठवण्याचा खर्चसुद्धा केंद्र सरकार सोसते
    # तुमच्याकडे आकृतीचे फाँटस आहेत व तुम्हाला श्रीलिपी फाँटची फाईल तुमच्या आकृती फाँटमध्ये रूपांतरित करायची आहे तर ते शक्य आहे. केंद्र सरकारने वरील वेबसाईटवर 'परिवर्तन' नावाचे एक सॉफ्टवेअर उपलब्ध केले आहे. ते वापरून तुम्ही दोन वेगवेगळ्या पॅकेजेसमधील फाँटच्या फाईल्स रूपांतरित करू शकता. तुम्ही पोस्टाने जी सीडी मागवता त्यातही हे सॉफ्टवेअर सरकारने दिले आहे.
    # केंद्र सरकारने www.ildc.in वर दोन प्रकारचे फाँटस डाऊनलोडींगसाठी ठेवले आहेत. पहिला प्रकार आहे OTF प्रकारचे किंवा Open Type Fonts. हे फाँटस युनिकोड आधारित असल्याने तुम्ही जीमेल, याहू, हॉटमेल वगैरे ईमेल कंपोज करण्यासाठी पाठवू शकता. अशी ईमेल तुम्ही जगात कुठेही आणि कोणालाही पाठवू शकता. ज्याला तुमची ही मराठी ईमेल मिळेल त्याच्याकडे कोणतेही मराठी फाँटस असण्याची आवश्यकता नाही. हे सारे युनिकोडच्या तंत्रामुळे आता शक्य झालेले आहे.
    दुसर्‍या प्रकारचे फाँटस केंद्र सरकारने दिले आहेत ते |TTF किंवा True Type Fonts. ह्या फाँटसंचा उपयोग करून तुम्ही Word, Pagemaker, Excel, Wordpad, Indesign, Coreldraw, One Note वगैरेंमध्ये मराठी टायपिंग करू शकता.

    टायपिंगसाठी तीन प्रकारचे मराठी कीबोर्डस् दिलेले आहेत. पहिला आहे Inscript. ज्यांना DOE कीबोर्ड वापरण्याची सवय आहे त्यांचेसाठी तो उपयुक्त आहे. दुसरा आहे Typewriter Keyboard. जे मतजल प्रकारचा टाईपरायटर (गोदरेज वा रेमिंग्टन) कीबोर्ड वापरतात त्यांचेसाठी तो उत्तम आहे. तिसरा कीबोर्ड आहे Phonetic. ज्यांना टायपिंग येत नाही त्यांचेसाठी तो आहे. समजा तुम्हाला 'प्रकाश' हे नाव टाईप करायचं असेल तर तुम्ही prakAsh असं इंग्रजीत टाईप करायचं. तुम्हाला मराठीत प्रकाश हा शब्द बिनचूकपणे मिळतो.

    तिसरा आणि अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे OTF चे युनिकोड फाँटस वापरून तुम्ही गुगलमध्ये मराठीत शोध घेऊ शकता. गुगलचा हा मराठी मजकूराचा शोध अत्यंत उपयुक्त आहे. करून पहा.
    Font Problem. Click here. असा हात वेबसाईटवर देण्याची आता गरजच लागणार नाही. कारण वेबसाईट जर युनिकोड फाँटसनी केलेली असेल तर जगात कुठेही फाँट नसले तरी मराठी वेबपेजेस उत्तमरित्या दिसतात. ज्यांच्या वेबसाईटस अद्यापि युनिकोड आधारित नाहीत त्यांनी त्या ताबडतोब कराव्यात म्हणजे Font Problem ची समस्या देवीच्या रोगासारखी नष्ट होईल. उद्या Font Problem दाखवा, हजार रूपये मिळवा अशा प्रचार घोषणाही सरकारला करता येणे अशक्य नाही.
    -माधव शिरवळकर

    वंडर हाऊ टू...

    ह्या साईटने 'हाऊ टू' हा प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला देऊ केला आहे. मुख्य म्हणजे त मोफत आहे.
    उदाहरणार्थ पहा - गणितातले अपूर्णांक तुम्हाला शिकता येतील ते ह्या साईटवरचा व्हिडीओ पाहून. किंवा आणखी इंटरेस्टींग सांगायचं तर डोकेदुखी घालवण्यासाठी मालीश कसं करायचं हे प्रत्यक्ष व्हिडीओ क्लीपमध्ये दिसलं तर वाचण्यापेक्षा सोपं आणि पक्क यात शंका नाही. ह्या खेरीज कॉंप्युटरशी संबंधित म्हणाल तर तुमच्या किबोर्डवरची विंडोज की कशी वापरायची किंवा विंडोज एक्सपी मध्ये एका कॉंप्युटरवर दोन मॉनिटर्स कसे लावायचे वगैरे. अशा प्रकारच्या विविध विषयावरच्या ९०,००० (नव्वद हजार फक्त) व्हिडिओ क्लीप्स www.wonderhowto.com वर आहेत.
    ह्या साईटवर सॉफ्टवेअर विषयक २६३२ व्हिडीओ आहेत. एमएस ऑफिस पासून ते फोटोशॉपपर्यंत आणि फ्लॅशपासून ते फाईलमेकर पर्यंत अनेकांची हाताळणी त्यात झालेली आहे. केवळ हार्डवेअर व तत्सम विषयक ८७० व्हिडीओंचा संग्रह इथे पहायला मिळतो. त्याखेरीज इलेक्ट्रॉनिक विषयाला वाहिलेल्या वेगळ्या ७३१ क्लीप्सही त्यात आहेत. यातील अनेक व्हिडीओ क्लीप्स विद्यार्थ्यांसाठीही खूप उपयुक्त आहेत.

    डाएट आणि आरोग्य ह्या विषयावरील ११७०, नृत्यविषयक ४५१, विविध कलाविषयक ११०३, एक हजारांहून अधिक जादूचे प्रयोग, पाळीव प्राणी विषयक ६४२ वगैरे विषयांची यादी खरच न संपणारी आहे. ही साईट सापडल्यानंतर पुढले कितीतरी आठवडे यातले अनेक दर्जेदार व्हिडीओ पाहण्यात मी घालवले. इथे ९०००० व्हिडीओ आहेत असा ह्या साईटचा दावा आहे. तो खरा असेलही किंवा नसेलही. पण एक मात्र नक्की की विविध विषयांवरच्या उपयुक्त अशा व्हिडीओ क्लीप्सचा खजिना तिथे आहे. तुम्हाला यांतून एखादा विशिष्ट विषय शोधायचा असेल तर 'सर्च' ची सोय त्यात आहे. पण त्याही पलिकडे एकूण ५०० व्हिडीओ ह्या साईटने टॉप म्हणून निवडूनही दिले आहेत. त्यावर नजर टाकली तरी आपले डोळे दिपून जातात.

    देशोदेशीचा माहितीकोश-

    जगात अफगाणिस्तान व अल्बेनिया पासून ते झांबिया आणि झिंबाब्वे पर्यंत अनेकविध देश आहेत. ह्या सर्व देशांची अतिशय बारीक सारीक माहिती अमेरिकेचे हेरखाते आपल्या सी.आय.ए. ह्या गुप्तहेर संघटनेच्या माध्यमातून गोळा करीत असते. ही गोळा केलेली माहिती दर पंधरा दिवसांनी तपासून अद्ययावत ठेवण्याची व्यवस्था सी.आय.ए. कडे आहे. वेगवेगळ्या देशांची इतकी अद्ययावत माहिती गोळा करणारी यंत्रणा जगात दुसरी नसावी. सामान्यतः एखादे हेरखाते जेव्हा अशी माहिती गोळा करते तेव्हा त्याबद्दल पूर्णपणे गुप्तता पाळण्यात येते. पण अमेरिकेच्या सी.आय.ए. चे वैशिष्ट्य हे की गोळा केलेल्या माहितीतील फार मोठा भाग ते जगाच्या माहितीसाठी मोफत खुला करतात. दर वर्षी सी.आय.ए. 'दि वर्ल्ड फॅक्टबुक' ह्या नावाचा एक भला मोठा ग्रंथच पुस्तक रूपाने प्रकाशित करते. गेली दहा वर्षे तर हा ग्रंथ जगासाठी इंटरनेटवर उपलब्ध करण्यांत येत आहे. आज त्याबद्दल 'एंटर' मध्ये लिहिण्याचे कारण म्हणजे हा देशोदेशीचा विशाल माहितीकोश तुम्हीही इंटरनेटवर पाहू शकता, वाचू शकता, त्या माहितीचा संदर्भासाठी उपयोग करू शकता. सी.आय.ए. सारखी जागतिक स्तरावरील आणि अमेरिकन सरकारच्या अधिपत्याखाली अधिकृतपणे काम करणारी संस्था जेव्हा अशी माहिती उपलब्ध करते, तेव्हा तिच्या विश्वासार्हतेबद्दल शंका बाळगण्याचे कारण नसते. इंटरनेटवर ही माहिती पाहण्यासाठीचा वेबपत्ता आहे - https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/


    दि वर्ल्ड फॅक्टबुक मध्ये १९४ स्वतंत्र देशांची अत्यंत सविस्तर अशी माहिती आहे. त्या व्यतिरिक्त तैवानसारखा अमेरिकेने अद्यापि मान्यता न दिलेला प्रदेश, वा ऑस्ट्रेलिया, ब्रिटन सारख्या खंडांतील काही प्रदेश वा बेटे वगैरेंची भर त्यात घातल्यास जगातील एकूण २६६ भौगोलिक क्षेत्रघटकांची माहिती ह्या कोशात आपल्याला मिळते.
    माहितीचे स्वरूप

    एखाद्या देशाची सविस्तर माहिती हा कोश देतो म्हणजे नेमकी कोणती माहिती त्यात आपल्याला मिळते हे समजून घेणे आवश्यक आहे. आपण त्यासाठी आपल्याच देशाचे उदाहरण घेऊ. भारताची माहिती देणार्‍या पानावर जेव्हा आपण येतो तेव्हा सर्वांत वर एक सूचना आपल्याला वाचायला मिळते. 'This page was last updated on 19 June 2008' हे वाक्य पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की कोणतेही छापिल पुस्तक आपल्याला इतकी अद्ययावत माहिती उपलब्ध करू शकणार नाही. कारण छापिल पुस्तकातील माहिती कंपोज आणि प्रुफरीड करून पुढे ती छापली जाऊन जेव्हा आपल्यापुढे येते तेव्हा ती किमान महिना दोन महिने तरी जुनी झालेली असते. ते पुस्तक छापल्यानंतर त्याच्या प्रती संपेपर्यंत पुढील आवृत्ती येत नसल्याने छापिल पुस्तकांतील माहिती जुनी जुनी होत जाते. 'दि वर्ल्ड फॅक्टबुक' इंटरनेटवर दर पंधरा दिवसांनी अपडेट होत असल्याने माहितीच्या अद्ययावततेच्या स्पर्धेत ते छापिल पुस्तकाला शर्यतीत खूपच मागे टाकते. ह्या कारणामुळेच जगभरातील लाखो अभ्यासकांसाठी हे फॅक्टबुक म्हणजे एक दैनंदिन संदर्भासाठीचा ग्रंथ झालेला आहे.


    आपण पुन्हा भारताच्या पानावर येऊ. भारताविषयीच्या माहितीचे पान आपण आपल्या प्रिंटरवर छापायचे ठरवले तर तो मजकूर ए-४ आकाराची एकूण १६ पाने व्यापतो. म्हणजेच भारतासारख्या एकूण २६६ भौगोलिक क्षेत्रघटकांची माहिती देण्यासाठी हे हँडबुक ३००० हून अधिक पानांचा मजकूर आपल्यापुढे उपलब्ध करते. भारताच्या पानावर सर्वात वर आपला तिरंगा झेंडा आणि भारताचा नकाशा आहे. त्यानंतर भारत देशाची एकूण ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडक्यात, पण आर्य - द्रविड ते मौर्य काळापर्यंत आणि पुढे इंग्रजांचा अंमल, स्वातंत्र्य चळवळ असे टप्पे घेत आजच्या काळापर्यंत दिलेली आपल्याला दिसते. ही थोडक्यात पार्श्वभूमी संपली की पुढे आपल्यावर माहितीचा एक जबरदस्त धबधबा कोसळू लागतो. भारताचे जमिनी व सामुद्रिक क्षेत्रफळ, सीमारेषांची किलोमीटरमधील लांबी (उदाहरणार्थ चीनची सीमा ३३८० कि.मी., पाकिस्तानची २९१२ कि.मी., नेपाळची १६९० कि.मी. वगैरे), शेती व बिगर शेती जमिनीचे क्षेत्रफळ हे तपशील प्रथम येतात. मग लोकसंख्येचे आकडे दिसू लागतात. त्यात एकूण लोकसंख्या, त्यात स्त्रिया किती, पुरूष किती, ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण किती, जन्म-मृ्त्यूचा दर किती वगैरे माहिती नेमकी दिलेली दिसते. पुढे भारतातल्या एड्स आणि एच.आय.व्ही. बाधितांचे आकडेही असतात. धर्माच्या निकषावर लोकसंख्येचे प्रमाण (हिंदू ८०.५%, मुस्लीम १३.४%, ख्रिस्ती २.३%, शीख १.९% वगैरे) देणारी टक्केवारी पुढे येते. कोणत्या भाषा बोलल्या जातात, साक्षरता किती आहे हा आणखी सविस्तर तपशीलही नोंदलेला दिसतो. एवढं झाल्यावर भारतातील सरकारी व राजकीय माहितीचा विभाग असतो. त्यात राज्यांची नावे, राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान मनमोहनसिंग, उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांच्या नावाचा उल्लेखही असतो. लोकसभेच्या ५४५ जागांपैकी ५४३ निवडणूकीने व २ जागा राष्ट्रपतींद्वारा नेमणूकीने भरल्या जातात हे देऊन काँग्रेस १४७, भाजपा १२९, सीपीआय(मा) ४३, स.प. ३८, शिवसेना १२, राष्ट्रवादी काँग्रेस १० वगैरे पक्के आकडे देऊन सरकारची रचना नेमकी कशी आहे हे दाखवलेलं असतं. राजकीय पक्षांचा तपशील देताना बहुजन समाज पार्टीच्या मायावतींपासून ते शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरें आणि काँग्रेसच्या सोनिया गांधींपर्यंत सर्व प्रमुख पक्षप्रमुखांची दखल घेतलेली दिसते. राजकीय दबाव गटात विश्व हिंदू परिषद, रा.स्व. संघ, बजरंग दलापासून ते हुरियत काँन्फरन्सनाही वगळलेले नसते.

    डाऊनलोडींगसाठी उपलब्ध

    हा सारा माहितीचा खजिना तुम्ही इंटरनेटवरून मोफत डाऊनलोड करून घेऊ शकता. निरनिराळ्या स्पर्धा परिक्षांना बसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी करन्ट इव्हेंटस वा जनरल अवेअरनेसचे ज्ञान सुधारण्यासाठी ह्या हँडबुकसारखे दुसरे साधन नाही. डाऊनलोड करण्यासाठी हा घ्या त्या लिंकचा पत्ताः https://www.cia.gov/library/publications/download


    सी.आय.ए. जगभरातील देशांची बारीक सारीक माहिती काढण्यासाठी किती आटापिटा करीत असेल याचा अंदाज ह्या हँडबुकवरून आपल्याला येतो. ह्या हँडबुकमध्ये आलेली माहिती ही तर दर्यामें खसखस आहे. इथे न आलेली प्रचंड माहिती त्यांनी गोपनीय म्हणून त्यांच्याकडे ठेवलेली असणार हे तर स्पष्टच आहे. पण जे काही त्यांनी जगभरातील सर्व देशांच्या संदर्भात आपल्याला देऊ केले आहे, ते ज्ञान म्हणून खरोखरीच उपयुक्त आणि अमोल आहे. चांगलं ते घ्यावं ह्या न्यायाने ह्या हँडबुककडे पहायला हवं.


    - माधव शिरवळकर

    फक्त ब्लॉग लिहून झाला लखपती

    नाव अमित अगरवाल. व्यवसाय ब्लॉगिंग. उत्पन्न वर्षाकाठी पन्नास लाखाहून
    अधिक. फक्त इंटरनेटवरील लेखन करुन अशा प्रकारे लाखो रुपये कमवण्यारा अमित भारतातील पहिला प्रोफेशनल ब्लॉगर म्हणजेच प्रो-ब्लॉगर ठरलाय.

    आपल्या या व्यवसायाबद्दल तो म्हणाला , की विषयाची आवड , त्यातील सखोल अभ्यास , सातत्यपूर्ण ब्लॉगिंग याद्वारे वाचकांच्या मनात स्वतःविषयी विश्वासार्हता निर्माण करुनच प्रो-ब्लॉगर म्हणून यशस्वी होता येऊ शकते. त्यामुळे हा व्यवसाय इंटरेंस्टिंग असला तरी सोपा मात्र नाही. एखाद्या विषयातील जाणकार असल्यास नोकरीवर विसंबून राहण्यापेक्षा प्रो-ब्लॉगिंग सारख्या नव्या व्यावसायिक लेखन प्रकाराच्या मदतीने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.

    अमित अगरवाल यांनी २००४ मध्ये नोकरी सोडून प्रो-ब्लॉगिंगसाठी स्वतःचा पूर्ण वेळ द्यायला सुरुवात केली. आज त्यांची स्वतःची labnol.org नावाची वेबसाइट आहे. प्रो ब्लॉगिंग तर अजूनही सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत आपल्या ब्लॉग आणि वेबसाइटसाठी गुगल अॅडसेन्स , ब्लॉग अॅड अशा विविध सेवांमार्फत अनेक जाहिराती मिळवल्या आहेत. निव्वळ जाहिरातींमधून अगरवाल वर्षाकाठी ५० लाखापेक्षा अधिक रकमेची कमाई करत आहेत.

    ‘ प्रो ब्लॉगिंग ’ विषयी...

    ब्लॉग म्हणजे पर्सनल डायरी. स्वतःचे विचार व्यक्त करण्यासाठी स्वतः तयार केलेले व्यासपीठ. पण बॉलीवूड स्टारच्या गेल्या काही दिवसांतील ब्लॉगिंगमुळे ब्लॉग म्हणजे एकमेकांची उणीदुणी काढण्याचे नवे माध्यम झाले आहे. मात्र ब्लॉगचा जसा टीका करण्यासाठी वापर होतो तसाच व्यावसायिक उपयोगही आहे. प्रो-ब्लॉगिंग हा तसाच एक व्यावसायिक प्रकार.

    प्रो-ब्लॉगिंगमध्ये ब्लॉग लिहिणारी व्यक्ती आपल्या आवडत्या विषयावर माहिती देऊ शकते. साधारणपणे ज्या विषयाचा सखोल अभ्यास आहे , त्याच विषयावर लेखन करण्याकडे प्रो-ब्लॉगरचा कल असतो. कारण ब्लॉग लिहिणा-यास त्या विषयाच्या संदर्भात एखादी शंका विचारण्यात आल्यास उत्तर देणे सोपे जाते.

    प्रो-ब्लॉगिंगचा आणखी एक फायदा म्हणजे ज्या विषयाशी संबंधित ब्लॉग आहे त्याच विषयाशी संबंधित जाहिराती घेऊन त्यातून प्रो ब्लॉगरना आर्थिक लाभ साधता येतो.

    लॅपटॉप घेताय?

    लॅपटॉप घेण्याचा विचार करताय? मग जरा थांबा... उगीच घाई करू नका. लॅपटॉप घेताना फक्त किंमत कमी आहे या निष्कर्षावर खरेदी केली जाते. त्यामुळे नंतर पस्तावण्याखेरीज काहीच उरत नाही. तशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी ही चेकलिस्ट...

    स्क्रीन क्वॉलिटी :
    लॅपटॉपची स्क्रीन ही ग्लॉसी आणि मॅट अशा दोन प्रकारात उपलब्ध असते. मॅन्युफॅक्चरर हल्ली बऱ्याचदा ग्लॉसी प्रकारचे लॅपटॉप बनवतात. हे ग्लॉसी लॅपटॉप सिनेमा बघण्यासाठी ठीक आहेत. पण, रोजचं ऑफिसवर्क करण्यासाठी हे लॅपटॉप कुचकामी ठरतात. ग्लॉसी स्क्रीनमुळे डोळ्यावर अकारण ताण पडतो. त्यामुळे तुम्ही जर सिनेमा बघण्यासाठी किंवा गेम खेळण्यासाठी लॅपटॉप घेत असाल, तरच ग्लॉसी स्क्रीन घ्या.

    नेटवर्क कनेक्टिविटी :
    बऱ्याच लॅपटॉपमध्ये इनबिल्ट वायरलेस नेटवर्क कनेक्टिविटी असते. पण फक्त एवढ्या आश्वासानावर भुलू नका. ही कनेक्टिविटी कोणत्या प्रकारची आहे ती समजून घ्या. अनेकदा यासाठी जुन्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. त्यामुळे इण्टरनेट आणि नेटवर्क कनेक्टिविटी स्लो होते. तसंच ही वायरलेस कनेक्टिविटी नंतर बदलता येत नाही. म्हणून लॅपटॉप घेण्यापूवीर्च ती अपग्रेडेबल आहे की नाही, याची काळजी घ्या. सध्या ८०२.११ एन ही वर्जन योग्य आहे, असं म्हणता येईल.

    रफ अॅण्ड टफ होगा तो बेहतर है :
    सध्या लॅपटॉपचा बाजार गरम आहे. अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसोबत अनेक लोकल ब्रॅण्डही या स्पधेर्त जोमाने उतरलेत. अनेकांनी आपल्या किमती खूप खाली आणल्या आहेत. पण या उतरलेल्या किमतीत लॅपटॉप घेताना आपण कुठे क्वालिटीशी तडजोड करत नाहीत ना, याची काळजी घ्या. लॅपटॉप ही गोष्ट अशी आहे, जी घेऊन आपल्याला प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यासोबत मिळणाऱ्या अॅक्ससरीज काय आहेत त्या पाहा. आपला लॅपटॉप फार नाजूक असून चालणार नाही हे लक्षात घ्या.

    डोकं तापवू नका आणि लॅपटॉपही... :
    लॅपटॉप मॅन्युफॅक्चरर हे आपल्या प्रोडक्टची जाहिरात करताना पॉवरफुल प्रोसेसर, फास्ट हार्ड डिस्क, हेवी बॅटरी अशी करतात. पण या साऱ्यामुळे लॅपटॉप तापतो हे आपल्याला सांगितलं जात नाही. त्यामुळे काही तासांच्या वापरानंतर लॅपटॉप गरम होण्याची शक्यता असते. आता बाजारात चांगल्या क्वालिटीचे असे लॅपटॉप मिळतात, की ज्यात उष्णतारोधक तंत्र वापरलेलं असतं. त्यामुळे लॅपटॉप घेण्यापूवीर् फक्त डीलर काय म्हणतो ते ऐकू नका, तो वापरणाऱ्या एकाचा तरी सल्ला घ्याच.

    लॅपटॉपचा आवाज बंद करा :
    आपण एवढ्या दमड्या मोजून लॅपटॉप घ्यायचा आणि वर त्या लॅपटॉपचाच आवाज ऐकायचा हे कोणाला आवडेल? पण कुलिंग फॅन आणि हार्ड ड्राइव्हच्या लोच्यामुळे अनेकदा लॅपटॉप आवाज करतो. कधीकधी ही भुणभुण एवढी इरिटेटिंग ठरते की त्यातून डोकेदुखीचा त्रास उद्भवतो. म्हणूनच लॅपटॉप घेतानाच या गोष्टीची काळजी घ्या. आपल्याला लॅपटॉप घ्यायचाय डोकेदुखी नको!

    टेक टिप्स

    समजा, तुमच्या कम्प्युटरवर एका वेळेला चार-पाच प्रोग्राम सुरू असतील आणि तुम्हाला डेस्कटॉपवर सेव केलेली एखादी फाइल उघडायची आहे. अशा वेळी आपण प्रत
    ्येक प्रोग्राम मिनीमाइज करत बसतो. असा एकेक प्रत्येक प्रोग्राम मिनीमाइज करण्यापेक्षा सरळ 'विण्डोज लोगो असलेलं बटण आणि एम' एकत्र दाबायचं. सर्व प्रोग्राम मिनीमाइज होऊन आपण डेस्कटॉपवर येतो. तसंच 'विण्डोज लोगो असलेलं बटण आणि डी'दाबूनही थेट डेस्कटॉपवर येता येतं.
    (की-बोर्डवरील विण्डोज लोगो असलेल्या बटणाला यापुढे आपण फक्तविण्डोज बटण म्हणू या.)

    * बऱ्याचदा आपल्याला अचानक विण्डोज एक्स्प्लोररमध्ये काही तरी शोधायचं असतं. अशा वेळी डेस्कटॉपवर येऊन एक्स्प्लोअर करण्याऐवजी 'विण्डोज बटण आणि इ' दाबल्यावर थेट विण्डोज एक्स्लोरर उघडतं.

    * अनेकदा काम सुरू असताना आपल्याला एखादी फाइल शोधायची असते. अशा वेळी स्टार्टमधून सर्चमध्ये जाण्याऐवजी थेट 'विण्डोज बटण आणि एफ' दाबल्यास थेट सर्च विण्डो ओपन होते.

    * काही वेळासाठी ब्रेक घेण्यासाठी आपण सुरू असेलेले प्रोग्राम तसंच ठेवून जातो. यामुळे कदाचित एखाद्याने त्यात ढवळाढवळ केल्यास आपल्या कामावर पाणी पडू शकते. यासाठी आपली स्क्रीन लॉक करून जाणं हिताचं ठरतं. यासाठी फक्त'विण्डोज बटण आणि एल' दोन बटणं दाबण्याचा अवकाश आपली स्क्रीन लॉक होते. यात आपल्याला पासवर्डही सेट करता येतो. त्यामुळे आपलं काम इतरांना कळू न देण्यासाठीही याचा उपयोग होतो.

    * अनेक कारणांसाठी आपल्याला विण्डोज हेल्पमधून काही प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. यासाठी 'विण्डोज बटण आणि एफ1' ही बटणं दाबल्यास थेट विण्डोज हेल्प आपल्यापुढे हजर!

    एका क्लिकने कम्प्युटर बंद

    आपण जेव्हा कम्प्युटर बंद करण्यासाठी 'Turn Off Computer'ची सूचना देतो, तेव्हा प्रत्यक्षात कम्प्युटरमधे 'कम्प्युटर बंद होण्याचा प्रोग्राम' सुरू होतो.
    म्हणजेच ज्याप्रमाणे आपण विण्डोजमधे निरनिराळे प्रोग्राम/सॉफ्टवेअर सुरू करतो, त्याचप्रमाणे कम्प्युटर बंद करतानाही त्याचप्रमाणे बंद होण्याचा प्रोग्राम सुरू होतो.

    काम करण्याच्या पद्धती जरी सर्वांच्या निरनिराळ्या असल्या, तरी कम्प्युटर बंद करताना सर्व जण एकाच पद्धतीने Start बटणावरील 'Turn Off Computer' या विभागाद्वारे कम्प्युटर बंद करतात.

    खाली दिलेल्या पद्धतीने आपण माऊसच्या एकाच क्लिकने कम्प्युटर बंद करण्याची सूचना देऊ शकता.

    * कम्प्युटरच्या डेस्कटॉपवर माऊसने राइटक्लिक करून येणाऱ्या छोट्या चौकोनातील New या विभागातील Shortcut या बटणावर क्लिक करा.

    * आता आपल्यासमोर Create Shortcut चा चौकोन सुरू होईल त्यात Shutdown -s -t 03 -c "Bye Bye !" हे टाइप करा आणि खालील हृद्ग३ह्ल > या बटणावर क्लिक करा.

    * आता आपल्यासमोर येणाऱ्या चौकोनात 'Shut Down' असे टाइप करा आणि खालील 'Finish' बटणावर क्लिक करा.

    * आता डेस्कटॉपवर 'Shut Down' नावाचा आयकॉन तयार होईल. त्याला माऊसने दाबून (Draging) विण्डोजवरील Task Bar मधील Quick Launch या विभागामधे नेऊन सोडा. असं केल्याने त्याजागेमधे कम्प्युटर बंद करण्यासाठी एक शॉर्टकट आयकॉन तयार होईल.

    * बस्स. इतकंच करायचं आहे. आता यापुढे जेव्हा आपणास कम्प्युटर बंद करायचा असेल, तेव्हा फक्त या छोट्या आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे कम्प्युटर बंद होईल.

    टीप : याच प्रमाणे कम्प्युटर बंद करून सुरू (Restart) करण्यासाठी Shutdown -t असं देऊन आपण नवीन शॉर्टकट आयकॉन बनवू शकता.

    नेटशिवाय ई-मेल

    ई-मेल चेक करण्यासाठी आता इण्टरनेटची कनेक्टिविटी गरज असते. मात्र आता इण्टरनेट कनेक्टिविटीशिवायही मेल चेक करता येणार आहे.


    ....

    समजा मला इण्टरनेट कनेक्टिविटी नसताना, ई-मेल चेक करायचं असेल, तर काय करावं लागेल? एक तर मला आउटलूकसारखं सॉफ्टवेअर वापरावं लागेल नाहीतर जी-मेल वापरावं लागेल. कारण मोस्ट पॉप्युलर इमेल अॅड्रेस असलेल्या जी-मेलने आता ऑॅफलाइन ई-मेल सविर्स सुरू केली आहे.

    या सविर्सचा उपयोग करून तुम्ही कमीतकमी इण्टरनेट कनेक्टिविटी वापरून जी-मेल वापरू शकता. म्हणजे काय? साध्या सोप्या पद्धतीने सांगायचं, तर भारतासारख्या देशात २४ तास इण्टरनेट ही अजूनही चैन आहे. अनेकदा जिथे इण्टरनेट मिळतं त्याचा स्पीडही वाईट असतो. अशा वेळी ही ऑॅफलाइन ई-मेल सविर्स वरदान ठरणार आहे.

    या सविर्समुळे जोपर्यंत इण्टरनेट आहे, तोपर्यंत जी-मेलवर तुम्हाला आलेले सर्व मेल तुमच्या कम्प्युटरमधे साठवेल. इण्टरनेट बंद झालं की तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवर सेव केलेले हे मेल वाचता येतील, त्यात बदल करता येतील. तसंच त्यांना रिप्लायही करता येतील. फक्तहे रिप्लाय जाणार नाहीत. जेव्हा कधी इण्टरनेट रिकनेक्ट होईल, तेव्हा हे ई-मेल आपोआप सेण्ड होतील.

    यासाठी जी-मेलमधे गुगल लॅबमधे तयार झालेली 'गुगल गिअर्स' ही टेक्नॉलॉजी वापरण्यात येते. त्यात लोकल कॅश मेमरीचा वापर करून तुमच्या मेलबॉक्समधील सर्व डेटा लोकल मशिनवर घेण्यात येतो. जोपर्यंत इण्टरनेट सुरू असते तोपर्यंत तुमचे सर्व ई-मेल्स गुगलच्या र्सव्हरशी सिंक्रोनाइझ केले जातात. इण्टरनेट बंद झाल्यानंतर जी-मेल आपोआप ऑफलाइन मोडमधे जातं आणि तिथेही तुम्ही मेल चेक करू शकता.

    ऑफलाइन जी-मेलची ही सविर्स सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करावं लागेल -

    * जी-मेलवर साइन-इन व्हा. सर्वात वरच्या बाजूला असलेल्या 'सेटिंग'च्या ऑॅप्शनवर क्लिक करा.

    * सेटिंगमधे असेलेल्या 'लॅब्स' या टॅबवर क्लिक करा

    * आता या लॅब्समध्ये तुम्हाला जी-मेल ऑॅफलाइन असा एक ऑप्शन दिसेल. तो 'एनेबल' करा.

    * पानाच्या सर्वात शेवटी असलेल्या 'सेव चंेजेस' या बटनावर क्लिक करा.

    * आता तुमचं जी-मेल ऑफलाइन वापरण्यासाठी सज्ज झालंय. Offline असा मेसेजही तुम्हाला सर्वात वर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात दिसू लागेल.

    * या Offline अशा लिंकवर क्लिक करून तुम्हाला गुगल गिअर इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा ब्राउझर रिस्टार्ट केल्यावर तुमचं जी-मेल तुम्ही ऑॅफलाइनही वापरू शकता.

    फक्तया ऑफलाइन जी-मेलचा वापर करून अटॅच केलेल्या फाइल्स डाउनलोड करता येत नाहीत. तसंच इनबॉक्समधील मेल डिलीट करता येत नाहीत. तरीही इण्टरनेट नसताना, आपला इनबॉक्स चेक करता येतोय, हेही काही कमी नाही. त्यामुळे आता कनेक्टिविवटी वीक असली, तरीही नो-प्रॉब्लेम.