शनिवार, २९ ऑगस्ट, २००९

स्वत:चे लेटरहेड!

वर्डचा उपयोग करून अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. अगदी स्वत:चे किंवा स्वत:च्या कंपनीचे लेटरहेडसुद्धा बनविता येते. त्यासाठी काय करावे लागते, त्याचा वेध...
.........
आज इंटरनेटवर कितीही फ्री वर्ड सॉफ्टवेअर उपलब्ध असले तरी आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डची सवय लागलेली आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डला पर्याय कोणते ते यापूवीर् आपण एका लेखात पाहिले आहे. पण या वर्डचा उपयोग आणखी किती पद्धतीने करता येतो हे फारजणांना माहीत नसते. मजकूर ऑपरेट करायला, त्यात एखादा चार्ट अथवा टेबल इन्सर्ट करायला, तसेच फोटो टाकायला वर्ड उपयोगी पडते. त्याचप्रमाणे मागील लेखात म्हटल्याप्रमाणे लेटरहेड तयार करायलाही उपयोगी पडते. यासाठी कोणी आटिर्स्ट मदतीला असण्याची गरज नाही.

प्रथम मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करा. वरती डाव्या बजूला फाइल, एडिटच्या रांगेत तिसरे बटन व्ह्यू असे असेल. त्यावर क्लिक करा. नंतर त्यातील हेडर अँड फूटरवर क्लिक करा. आपोआप तुमच्या ओपन फाइलमध्ये एक बॉक्स दिसेल. त्यात तुमचे नाव, आवश्यक असल्यास एखादे स्लोगन, स्वत:चे नाव द्यायचे नसल्यास कंपनीचे नाव टाइप करा. ते झाल्यावर वरच्या टूलबारमधून ते सेंटरला आणा. (बी आय यू या बटनांच्या लाइनमध्ये पुढे सेंटरचे बटन आहे) तुम्हाला वरच्या भागात तुमचा स्वत:चा फोटो अथवा कंपनीचा लोगो इन्सर्ट करायचा असल्यास तोही करा. मात्र हा लोगो अथवा फोटो तुमच्या मशीनमध्ये आधी सेव्ह करायला लागेल. जिथे तो इन्सर्ट करायचा असेल तिथे माऊसचा कर्सर न्या आणि वरती डावीकडे व्ह्युनंतर असलेल्या इन्सर्ट बटनावर क्लिक करा. तिथे बरीच ऑप्शन्स असतील. अगदी तारीखही इन्सर्ट करता येईल, पेज नंबर टाकता येईल अथवा एखादा डायग्रामही टाकता येईल. पण तुम्हाला आत्ता फोटो टाकायचा असल्याने 'इन्सर्ट पिक्चर'वर क्लिक करा. मग तो फोटो कुठे सेव्ह केला आहे तिथे जाऊन तो अपलोड करा. तो फोटो दिसायला लागल्यावर ज्या जागेवर असणे आवश्यक आहे तिथे नेऊन ठेवा. आणखी काही तपशील हेडिंगमध्ये द्यायचा असेल तर तो द्या, त्याचा फाँट साइझ कमीजास्त करा.

हे झाले लेटरहेडच्या वरच्या भागाचे. आता तळाला तुमचा वा कंपनीचा पत्ता आणि फोन नंबर देता येईल. त्यासाठी 'हेडर अँड फूटर' या पट्टीतच 'स्विच बिटविन हेडर अँड फूटर' यावर क्लिक करा. की पानाच्या तळाला बॉक्स तयार होईल. त्यात पत्ता व इतर तपशील द्या. त्याचा लेआऊटही आवश्यकतेनुसार करा. हे झाले की सारे पान सेव्ह करायला हवे. इथे विशेष खबरदारी घ्यावी लागेल. लेटरहेडच्या 'फाइल'मध्ये जा, 'सेव्ह अॅज' म्हणा व फाइल 'डॉक्युमेंट टेम्प्लेट' म्हणजेच डॉट फाइल म्हणून सेव्ह करा. डॉक किंवा आरटीएफ वगैरे सेव्ह करू नका. म्हणजेच फाइलला तुम्ही लेटरहेरड असे नाव दिले असेल तर 'लेटरहेड.डॉट' अशी फाइल तयार होईल. ती सेव्ह कुठे कराल? हार्डडिस्कच्या (उदा. सी ड्राइव्ह) ड्राइव्हमध्ये टेम्प्लेट असा वेगळा फोल्डर असेल त्यात सेव्ह करा. साऱ्या डॉट फाइल यातच सेव्ह केल्या तर शोधाशोध करायला लागणार नाही. या फाइलची एक कॉपी डेस्कटॉपवर करून ठेवा. जेव्हाकेव्हा लेटरहेडवर काही मजकूर टाइप करायचा असेल, तेव्हा डेस्कटॉपवरची फाइलच ओपन करा व त्यात टाइप करा. तुमच्याकडे कलर प्रिंटर उपलब्ध असेल तर चांगलेच; नसला तरी ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटरवरही स्वत:च्या लेटरहेडवरचे पत्र चांगलेच दिसेल.

लेटरहेडच्या मांडणीत आणखी विविधता आणायची असेल तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्येच वरती फाइल, व्ह्यूच्याच ओळीत फॉरमॅट म्हणून बटन असेल। (वर्ड २००३मध्ये ते आहे) त्यावर क्लिक केलेत की खाली 'थीम' असे दिसेल. त्यातली कोणतीही थीम निवडा व त्याप्रमाणे लेटरहेड तयार करा. एकच थीम कायम ठेवायची नसेल तर लेटरहेड थीमशिवाय तयार करा व पत्र पाठवतेवेळी वेगवेगळी थीम द्या. वर्डमध्ये काम करायला वेगळीच गंमत येईल.
- अशोक पानवालकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा