बुधवार, ८ जुलै, २००९

वंडर हाऊ टू...

ह्या साईटने 'हाऊ टू' हा प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला देऊ केला आहे. मुख्य म्हणजे त मोफत आहे.
उदाहरणार्थ पहा - गणितातले अपूर्णांक तुम्हाला शिकता येतील ते ह्या साईटवरचा व्हिडीओ पाहून. किंवा आणखी इंटरेस्टींग सांगायचं तर डोकेदुखी घालवण्यासाठी मालीश कसं करायचं हे प्रत्यक्ष व्हिडीओ क्लीपमध्ये दिसलं तर वाचण्यापेक्षा सोपं आणि पक्क यात शंका नाही. ह्या खेरीज कॉंप्युटरशी संबंधित म्हणाल तर तुमच्या किबोर्डवरची विंडोज की कशी वापरायची किंवा विंडोज एक्सपी मध्ये एका कॉंप्युटरवर दोन मॉनिटर्स कसे लावायचे वगैरे. अशा प्रकारच्या विविध विषयावरच्या ९०,००० (नव्वद हजार फक्त) व्हिडिओ क्लीप्स www.wonderhowto.com वर आहेत.
ह्या साईटवर सॉफ्टवेअर विषयक २६३२ व्हिडीओ आहेत. एमएस ऑफिस पासून ते फोटोशॉपपर्यंत आणि फ्लॅशपासून ते फाईलमेकर पर्यंत अनेकांची हाताळणी त्यात झालेली आहे. केवळ हार्डवेअर व तत्सम विषयक ८७० व्हिडीओंचा संग्रह इथे पहायला मिळतो. त्याखेरीज इलेक्ट्रॉनिक विषयाला वाहिलेल्या वेगळ्या ७३१ क्लीप्सही त्यात आहेत. यातील अनेक व्हिडीओ क्लीप्स विद्यार्थ्यांसाठीही खूप उपयुक्त आहेत.

डाएट आणि आरोग्य ह्या विषयावरील ११७०, नृत्यविषयक ४५१, विविध कलाविषयक ११०३, एक हजारांहून अधिक जादूचे प्रयोग, पाळीव प्राणी विषयक ६४२ वगैरे विषयांची यादी खरच न संपणारी आहे. ही साईट सापडल्यानंतर पुढले कितीतरी आठवडे यातले अनेक दर्जेदार व्हिडीओ पाहण्यात मी घालवले. इथे ९०००० व्हिडीओ आहेत असा ह्या साईटचा दावा आहे. तो खरा असेलही किंवा नसेलही. पण एक मात्र नक्की की विविध विषयांवरच्या उपयुक्त अशा व्हिडीओ क्लीप्सचा खजिना तिथे आहे. तुम्हाला यांतून एखादा विशिष्ट विषय शोधायचा असेल तर 'सर्च' ची सोय त्यात आहे. पण त्याही पलिकडे एकूण ५०० व्हिडीओ ह्या साईटने टॉप म्हणून निवडूनही दिले आहेत. त्यावर नजर टाकली तरी आपले डोळे दिपून जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा