बुधवार, ८ जुलै, २००९

फक्त ब्लॉग लिहून झाला लखपती

नाव अमित अगरवाल. व्यवसाय ब्लॉगिंग. उत्पन्न वर्षाकाठी पन्नास लाखाहून
अधिक. फक्त इंटरनेटवरील लेखन करुन अशा प्रकारे लाखो रुपये कमवण्यारा अमित भारतातील पहिला प्रोफेशनल ब्लॉगर म्हणजेच प्रो-ब्लॉगर ठरलाय.

आपल्या या व्यवसायाबद्दल तो म्हणाला , की विषयाची आवड , त्यातील सखोल अभ्यास , सातत्यपूर्ण ब्लॉगिंग याद्वारे वाचकांच्या मनात स्वतःविषयी विश्वासार्हता निर्माण करुनच प्रो-ब्लॉगर म्हणून यशस्वी होता येऊ शकते. त्यामुळे हा व्यवसाय इंटरेंस्टिंग असला तरी सोपा मात्र नाही. एखाद्या विषयातील जाणकार असल्यास नोकरीवर विसंबून राहण्यापेक्षा प्रो-ब्लॉगिंग सारख्या नव्या व्यावसायिक लेखन प्रकाराच्या मदतीने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.

अमित अगरवाल यांनी २००४ मध्ये नोकरी सोडून प्रो-ब्लॉगिंगसाठी स्वतःचा पूर्ण वेळ द्यायला सुरुवात केली. आज त्यांची स्वतःची labnol.org नावाची वेबसाइट आहे. प्रो ब्लॉगिंग तर अजूनही सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत आपल्या ब्लॉग आणि वेबसाइटसाठी गुगल अॅडसेन्स , ब्लॉग अॅड अशा विविध सेवांमार्फत अनेक जाहिराती मिळवल्या आहेत. निव्वळ जाहिरातींमधून अगरवाल वर्षाकाठी ५० लाखापेक्षा अधिक रकमेची कमाई करत आहेत.

‘ प्रो ब्लॉगिंग ’ विषयी...

ब्लॉग म्हणजे पर्सनल डायरी. स्वतःचे विचार व्यक्त करण्यासाठी स्वतः तयार केलेले व्यासपीठ. पण बॉलीवूड स्टारच्या गेल्या काही दिवसांतील ब्लॉगिंगमुळे ब्लॉग म्हणजे एकमेकांची उणीदुणी काढण्याचे नवे माध्यम झाले आहे. मात्र ब्लॉगचा जसा टीका करण्यासाठी वापर होतो तसाच व्यावसायिक उपयोगही आहे. प्रो-ब्लॉगिंग हा तसाच एक व्यावसायिक प्रकार.

प्रो-ब्लॉगिंगमध्ये ब्लॉग लिहिणारी व्यक्ती आपल्या आवडत्या विषयावर माहिती देऊ शकते. साधारणपणे ज्या विषयाचा सखोल अभ्यास आहे , त्याच विषयावर लेखन करण्याकडे प्रो-ब्लॉगरचा कल असतो. कारण ब्लॉग लिहिणा-यास त्या विषयाच्या संदर्भात एखादी शंका विचारण्यात आल्यास उत्तर देणे सोपे जाते.

प्रो-ब्लॉगिंगचा आणखी एक फायदा म्हणजे ज्या विषयाशी संबंधित ब्लॉग आहे त्याच विषयाशी संबंधित जाहिराती घेऊन त्यातून प्रो ब्लॉगरना आर्थिक लाभ साधता येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा